एनसर्कल

आता ‘पीएफ’ची रक्कम घ्या नियमित हफ्त्याने

निवृत्तीनंतर पीएफचे पैसे एकाचवेळी काढायचे की हफ्त्याने घ्यायचे, हा प्रश्न आता सुटला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने गुरुवारी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी)ला मंजुरी दिली. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी)च्या २४०व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर सदस्यांना संपूर्ण पीएफ रक्कम एकरकमी काढावी लागत होती. आता सदस्यांना आपली संपूर्ण रक्कम ईपीएफओकडेच ठेवून दरमहा, त्रैमासिक किंवा वार्षिक हफ्त्यांमध्ये नियमित घेता येणार आहे. उरलेली रक्कम सदस्याच्याच नावे राहील आणि त्यावर सध्याच्या ८.२५ टक्के दराने व्याजही मिळत राहील. याचा फायदा...

शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी नियंत्रण...

राज्यातल्या शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी...

रिअर ॲडमिरल डिसोझा...

रिअर ॲडमिरल नेल्सन डिसोझा यांनी एअर व्हाइस मार्शल विवेक ब्लोरिया यांच्याकडून काल पुण्यातल्या मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेच्या कमांडंटपदाचा कार्यभार स्वीकारला. वेलिंग्टन येथील डिफेन्स...

काश्मीरमध्ये होणार महाराष्ट्र...

महाराष्ट्र शासन आता लवकरच काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३०...

आदित्‍य बिर्ला सन...

आदित्‍य बिर्ला सन लाइफ म्‍युच्‍युअल फंडने नुकताच आदित्‍य बिर्ला सन लाइफ क्‍वांट फंड लाँच केला असून त्याच्या एनएफओ सबस्क्रिप्‍शनसाठी २४ जून २०२४पर्यंत खुला राहिल....

विधान परिषदेच्या ११...

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ...

‘मिफ्फ’मध्ये भरला माहितीपटांचा...

18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) काल पहिल्यावहिल्या माहितीपटांच्या बाजाराचे (बाझार)चे उद्घाटन झाले. हा उपक्रम मिफ्फसाठी, दक्षिण आशियातील चित्रपटेतर पटांसाठी मुख्य व्यासपीठ म्हणून एक...

6 कोटींची तस्करीत...

विशेष गुप्तचर आणि तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी न्हावा शेवाच्या जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस येथे नुकत्याच केलेल्या कारवाईत दहा कंटेनरमधली 112.14 मेट्रिक टन सुपारी (अरेका नट्स) जप्त...

पंतप्रधान मोदी आज...

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आमंत्रण स्वीकारून तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पहिल्यांदाच इटलीतील अपुलिया प्रांतात आज होत असलेल्या जी7 शिखर परिषदेत...

निधीवाटपात केंद्राकडून महाराष्ट्राला...

महाराष्ट्रातून जीएसटीसह सर्व प्रकारच्या करसंकलनातून सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो. पण राज्याला निधी देताना मात्र केंद्राकडून हात आखडता घेतला जातो. नरेंद्र मोदी...
Skip to content