Homeन्यूज ॲट अ ग्लांसलोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना...

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना ३० नोव्हेंबरला?

महिला आरक्षणाला जोडून देशातल्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी आणि ही प्रक्रिया २०२९च्या लोकसभा निवडणुकीआधी पूर्ण करण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपासून संसदेचे चार दिवसांचे अधिवेशन होणार असल्याचे समजते. येत्या ३० नोव्हेंबरला लोकसभेचे एक दिवसाचे अधिवेशन होईल तर दोन डिसेंबरला राज्यसभेत एका दिवसाचे कामकाज होईल. संसदेचे नुकतेच झालेले मान्सून सत्र संस्थगित झालेले नव्हते. त्यामुळे सरकारला आता विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज नाही.

मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी सरकारला लोकसभेत दोनतृतियांश बहुमत हवे. एप्रिलमधे झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात हेच विधेयक लोकसभेने बहुमताअभावी फेटाळले. लोकसभेत मतदानाच्या वेळी सर्व ५४३ खासदार उपस्थित असतील तर विधेयक मंजुरीसाठी ३६२ जणांचे मतदान अनुकूल पडले पाहिजे. एप्रिल महिन्यात झालेल्या विशेष अधिवेशनात याच विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली तर विरोधात २३० मते नोंदवली गेली. लोकसभेत सत्ताधारी भाजपाप्रणित एनडीएसोबत असलेल्या खासदारांची संख्या आता ३१८ वर पोहोचली आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकला मंजुरीसाठी सरकारला लोकसभेत आणखी ४० तर राज्यसभेत ८ खासदारांचे समर्थन मिळवायचे आहे. राज्यसभेत द्रमुकचे ९, वायएसआर काँग्रेसचे ४ व बिजू जनता दलाच्या ५ खासदारांवर भाजपाचे लक्ष आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकानुसार देशात सध्या लोकसभेचे ५४३ मतदारसंघ आहेत, ते नंतर ८५० होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

‘मालवणी रोंबाट’चे प्रकाशन

कवी अरविंद परुळेकर लिखित 'मालवणी रोंबाट', या अनोख्या साहित्यकृतीचा भव्य प्रकाशन सोहळा काल रविवारी, मुंबईतल्या गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास एखाद्या कौटुंबिक मेळाव्याचे स्वरूप आले होते. कवि अशोक नायगावकर, प्रसाद कुलकर्णी, शशिकांत तिरोडकर, प्रख्यात...

समकालीन भान आणि साहित्यिक मूल्य जपणारा ‘हेमांगी’!

महाराष्ट्रातील दर्जेदार दिवाळी अंकाच्या परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे ‘हेमांगी’. यंदा ‘हेमांगी’चा ५१वा दिवाळी अंक प्रकाशित झाला. यंदाच्या काही मोजक्या सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांमध्ये या अंकाचा समावेश करावा लागेल. या अंकात ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी अमेरिका-इराण युद्धाची नेमकी कारणे कोणती,...

आता टोलनाका ओलांडतानाच तपासला जाणार गाडीचा विमा

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका ओलांडताना आता फास्टॅगद्वारे केवळ टोलच कापला जाणार नाही, तर वाहनाच्या थर्ड पार्टी विम्याची वैधताही तपासली जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)ने ही नवीन स्वयंचलित यंत्रणा सुरू केली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर...
Skip to content