कवी अरविंद परुळेकर लिखित ‘मालवणी रोंबाट’, या अनोख्या साहित्यकृतीचा भव्य प्रकाशन सोहळा काल रविवारी, मुंबईतल्या गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास एखाद्या कौटुंबिक मेळाव्याचे स्वरूप आले होते. कवि अशोक नायगावकर, प्रसाद कुलकर्णी, शशिकांत तिरोडकर, प्रख्यात साहित्यिक रामदास प्रभुगावकर आणि आर्किटेक्ट जयवंत नाईक यांच्या हस्ते या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले.

कार्यक्रमाचे खुमासदार आणि बहारदार निवेदन सुप्रसिद्ध निवेदिका स्मिता आपटे यांनी केले. माधवी पाटील, पूर्वा पाठक आणि रेणू शुक्रे यांनी आपल्या सुमधुर स्वरांतून लोकप्रिय मराठी गीतांची सुरेल मैफल सादर करून कार्यक्रमाची शान वाढवली. अनेक प्रतिभावान कवींनी आपल्या निवडक आणि बहारदार कवितांचे सादरीकरण करून रसिकांना प्रभावित केले.
अशा या साहित्य, संगीत आणि कवितेच्या त्रिवेणी संगमात सहभागी होऊन प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद लूटला.

