Friday, July 12, 2024
Homeएनसर्कलआदित्‍य बिर्ला सन...

आदित्‍य बिर्ला सन लाइफ क्‍वांट फंड लाँच

आदित्‍य बिर्ला सन लाइफ म्‍युच्‍युअल फंडने नुकताच आदित्‍य बिर्ला सन लाइफ क्‍वांट फंड लाँच केला असून त्याच्या एनएफओ सबस्क्रिप्‍शनसाठी २४ जून २०२४पर्यंत खुला राहिल. ही क्‍वांट-आधारित गुंतवणूक थीमला अनुसरून ओपन-एंडेड इक्विटी स्किम आहे.

आदित्‍य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेड (एबीएसएलएएमसी)ची स्‍थापना १९९४मध्‍ये करण्‍यात आली. आदित्‍य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि सन लाइफ (इंडिया) एएमसी इन्‍व्‍हेस्‍टमेंट्स इन्‍क, या कंपनीच्‍या प्रमोटर्स व प्रमुख भागधारक आहेत. एबीएसएलएएमसी प्रामुख्‍याने इंडियन ट्रस्‍ट्स अॅक्‍ट, १८८२ अंतर्गत नोंदणीकृत आदित्‍य बिर्ला सन लाइफ म्‍युच्‍युअल फंडची गुंतवणूक व्यवस्‍थापक आहे. अॅस्‍सेट मॅनेजरनेदेखील क्‍वांट-आधारित गुंतवणूक थीमला अनुसरुन ओपन-एंडेड इक्विटी स्किम आदित्‍य बिर्ला सन लाइफ क्‍वांट फंडच्‍या लाँचची घोषणा केली आहे. न्‍यू फंड ऑफर (एनएफओ) १० जून ते २४ जून २०२४ पर्यंत खुला राहिल.

फंडाचे गुंतवणूक धोरण प्रोप्रायटरी क्‍वांटिटेटिव्‍ह मॉडेलच्‍या अवतीभोवती तयार करण्‍यात आले आहे, ज्‍याचा व्‍यक्‍ती व मशिनला एकत्र आणत दोन्‍ही विश्‍वातील सर्वोत्तम गोष्‍टींचा फायदा घेण्‍याचा मानस आहे. क्‍वांट गुंतवणुकीवर भीतीचा कोणताच प्रभाव पडत नाही. त्यामुळे हा भावनामुक्‍त गुंतवणूक दृष्टिकोन ठरतो. मॉडेलआधारित गुंतवणूक उत्तम स्थिरता व पुनरावृत्ती क्षमता देते तसेच एण्‍ट्री व एक्झिट

पॉइण्‍ट्स आधीच निर्धारित करत शिस्‍तबद्धतादेखील राखते. ही गुंतवणूक पारदर्शकतेमध्‍ये अधिक वाढ करते तसेच प्रत्‍येक निर्णय नियमावर आधारित असतो आणि सर्वोत्तम जोखीम व्‍यवस्‍थापन देते. त्यामुळे व्‍यक्‍ती व मशिनचे पोर्टफोलिओवर देखरेख राहते.

नवीन फंड लाँचबाबत आदित्‍य बिर्ला सन लाइफ एएमसी लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी ए. बालसुब्रमण्‍यम म्‍हणाले की, आजच्‍या गुंतागुंतीच्‍या बाजारपेठांमध्‍ये आमचा विश्‍वास आहे की, क्‍वांटिटेटिव्‍ह गुंतवणूक धोरणे सुधारित पारदर्शकता, भावनामुक्‍त निर्णय घेणे आणि प्रबळ जोखीम व्‍यवस्‍थापन अशी बहुमूल्‍य फायदे देऊ शकतात. क्‍वांट फंडचा गुंतवणूकदारांना वैविध्‍यपूर्ण गुंतवणूक सोल्‍यूशन देण्‍यासाठी मानवी कौशल्‍य आणि क्‍वांटिटेटिव्‍ह मॉडेल्‍सच्‍या संयुक्‍त क्षमतांचा फायदा देण्‍याचा आमचा प्रयत्न आहे. आदित्‍य बिर्ला सन लाइफ क्‍वांट फंड तंत्रज्ञानाचे पाठबळ आणि कुशल व्‍यक्‍तींचे मार्गदर्शन असलेल्‍या नाविन्‍यपूर्ण गुंतवणूक प्रक्रियेसाठी प्रबळ, संशोधनसंचालित दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून गुंतवणूकदारांना हे फायदे देईल.

या फंड ऑफरिंगबाबत आदित्‍य बिर्ला सन लाइफ एएमसी लि.चे को-सीआयओ व इक्विटी प्रमुख हरिश कृष्‍णन म्‍हणाले की, आमच्‍या फंड हाऊसमधील ही अशाप्रकारची पहिलीच ऑफरिंग आहे. आम्‍ही स्‍टॉक्‍सची मर्यादा काहीशी कमी करू, ज्‍यामुळे ते लार्ज व मिडकॅप श्रेणीमध्‍ये येतील. अधिक पुढे जात आम्‍ही त्‍यांच्‍या मुलभूत ट्रॅक रेकार्डवर आधारित स्‍टॉक्‍सच्‍या दर्जाचे मूल्‍यांकन करू. यानंतर आम्‍ही या क्षेत्रात गेल्‍या ६ महिन्‍यांमध्‍ये निर्माण झालेले संबंधित परताव्‍यांवर लक्ष केंद्रित करू आणि त्‍यानंतर विविध विक्रीसंबंधित विश्‍लेषकांनी दिलेल्‍या मिश्रित स्‍कोअरवर लक्ष केंद्रित करू. शेवटी, आम्‍ही सर्वांना समप्रमाणात महत्त्व देत ४० ते ५० स्‍टॉक्‍सचा समावेश असलेला पोर्टफोलिओ तयार करू आणि त्‍यानंतर कमी स्थिरतेच्‍या आधारावर वैयक्तिक स्‍टॉक्‍सच्‍या मर्यादा कमी करू.

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!