Sunday, September 8, 2024

पब्लिक फिगर

टॉवरमधल्या लिफ्टला काचेच्या दरवाजांचे आश्वासन कागदावरच!

मुंबई-पुण्यातल्या स्टँड अलोन (एकाकी) टॉवरमधल्या लिफ्टमध्ये होणारे महिलांच्या विनयभंगांच्या घटना रोखण्यासाठी लिफ्टना काचेचे दरवाजे अनिवार्य करण्याचे राज्य सरकारने तेव्हाचे आमदार अनंत गाडगीळ यांना दिलेले आश्वासन अद्यापही आश्वासनच राहिले आहे. मुंबई-पुण्यातील उंच इमारतींमधील (टॉवर) बंद लोखंडी दरवाज्यांच्या लिफ्टमध्ये (उदवाहन) लहान वा तरुण मुलींसोबत शारीरिक गैरवर्तनाचे प्रकार वाढत चाललेले आहेत. विशेषकरून 'स्टॅन्ड अलोन' म्हणजे  अनेक इमारतींच्या सोसायट्यांऐवजी एकच इमारत असलेल्या सोसायट्यांमधून सदर प्रकार सातत्याने  घडत आहेत. ही बाब वेळीच गांभीर्याने घ्या, असा इशारा तत्कालीन काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ  यांनी ५-६ वर्षांपूर्वीच महिला सुरक्षितता विषयावर विधानपरिषदेत झालेल्या चर्चेत दिला होता. एवढेच  नव्हे तर अशा घटनांचा तपशीलही सभागृहात मांडला होता. अनेकदा भीतीपोटी अशा प्रकारांची मुलींकडून पोलिसांकडे तक्रारच दाखल केली जात नाही. यावर  उपाय म्हणून उंच इमारतींमधील लिफ्टला काचेची दारे अनिर्वाय (कंप्लसरी) करावी, अशी सूचना  गाडगीळ यांनी केली होती. वास्तविक पाहता इमारतीला आग लागल्यावर लिफ्टचा वापर करावयाचा  नसतो, तरीही अग्निशमनदल लोखण्डी दरवाजे अनिर्वाय करतात. हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये चुकीचे  आहे, हे एक आर्किटेक्ट या नात्याने गाडगीळ यांनी दाखवूनही दिले होते. त्यानंतर तत्कालीन बांधकाममंत्र्यांनी उंच इमारतींमधील लिफ्टमध्ये सीसीटीव्ही व काचेची दारे अनिर्वाय केली जातील असे  सभागृहात घोषितही केले होते. मात्र, आज ५-६ वर्षे उलटून गेली तरीही सरकारने हे बंधनकारक केलेले नाही, असे गाडगीळ यांनी निदर्शनास आणले. इतकेच नव्हे तर गाडगीळ यांनी राज्य व राष्ट्रीय महिला आयोगास पत्र लिहून महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे अत्यावश्यक असल्याने आयोगांनी सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली होती. तथापि राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांनी सदर पत्र बांधकाममंत्र्यांना पुढे पाठवायचे एवढेच काम केले तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांनी गाडगीळांच्या पत्रास उत्तरही दिले नाही. यावरून महायुती सरकार महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावर गंभीर नाही,...

टॉवरमधल्या लिफ्टला काचेच्या...

मुंबई-पुण्यातल्या स्टँड अलोन (एकाकी) टॉवरमधल्या लिफ्टमध्ये होणारे महिलांच्या विनयभंगांच्या घटना रोखण्यासाठी लिफ्टना काचेचे दरवाजे अनिवार्य करण्याचे राज्य सरकारने तेव्हाचे आमदार अनंत गाडगीळ यांना दिलेले...

घटनात्मक पदावरची व्यक्ती...

घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती “आपल्या अर्थव्यवस्थेचा नाश करण्याच्या उद्देशाने प्रसारित केल्या जात असलेल्या खोट्या नरेटीव्हला बळ देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्राचा वापर करण्याचे आवाहन...

देशावरचे संकट आजही...

देशावरचे संकट अद्याप गेलेले नाही. लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर सध्याचे सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही लढाई एकजुटीने...

तिकिटे न मिळाल्याने...

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकणदरम्यान सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत ते फुल्ल झाल्याचे दिसले. त्यामुळे हजारो कोकणवासीय चाकरमान्यांमध्ये तीव्र...

महमद युनूस बांगलादेशचे...

बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी नोबेल पारितोषिक विजेते महमद युनूस यांची हंगामी पंतप्रधान म्हणून सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. हा निर्णय मंगळवारी रात्री उशिरा...

2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था...

भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत आता 5व्या क्रमांकावर असून 2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर येऊन भारत जगात जागतिक महासत्ता होईल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय...

लोककला, गडकिल्ले राखणारे...

महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन, कारागिरी, गडकिल्ले यांचे संवर्धन आणि विविध लोककला, नृत्य, संगीत यांना प्रोत्साहन देणारे राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार होत असून लवकरच या धोरणास...

महिला स्टार्टअपना सुवर्णसंधी!

महाराष्ट्राच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने प्रारंभिक टप्प्यातील महिला नेतृत्त्वातील स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना...

अमित शाहंची तडीपारी...

शरद पवार सहभागी असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार केंद्रात सत्तेत होते. त्यावेळच्या युपीए सरकारने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून अमित शाह यांच्यावर खोटे गुन्हे...
error: Content is protected !!
Skip to content