Homeएनसर्कल'मिफ्फ'मध्ये भरला माहितीपटांचा...

‘मिफ्फ’मध्ये भरला माहितीपटांचा बाजार!

18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) काल पहिल्यावहिल्या माहितीपटांच्या बाजाराचे (बाझार)चे उद्घाटन झाले. हा उपक्रम मिफ्फसाठी, दक्षिण आशियातील चित्रपटेतर पटांसाठी मुख्य व्यासपीठ म्हणून एक मैलाचा दगड ठरला आहे.

माहितीपटांचा ‘बाझार’ हा एक अग्रगण्य उपक्रम आहे, ज्याचा उद्देश चित्रपट निर्मात्यांना खरेदीदार, प्रायोजक आणि सहयोगी यांच्याशी जोडण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ मिळवून देऊन माहितीपट उद्योग उंचावणे हा आहे. 16 ते 18 जून 2024 या कालावधीत एनएफडीसी संकुलात आयोजित या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात 27 भाषांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 10 देशांमधील जवळपास 200 माहितीपट समाविष्ट आहेत.

चित्रपट निर्मात्या अपूर्वा बक्षी यांनी माहितीपटांच्या ‘बाझार’चे उद्घाटन केले. यावेळी  मिफ्फ चित्रपट महोत्सव संचालक आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार आणि पत्र सूचना कार्यालय (पश्चिम विभाग)च्या अतिरिक्त महासंचालक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (सी बी एफ सी)च्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता वत्स शर्मा उपस्थित होते.

माहितीपटांच्या ‘बाझार’मधले तीन निवडक टप्पे (क्युरेटेड वर्टिकल):

  • सह-निर्मिती बाजार: 16 प्रकल्पांचा समावेश असलेला, हा विभाग चित्रपट निर्मात्यांना जगभरातील संभाव्य सहयोगी, निर्माते, सहनिर्माते आणि वित्तपुरवठादारांशी जोडतो.
  • प्रक्रिया सुरु असणारी प्रयोगशाळा {वर्क-इन-प्रोग्रेस लॅब}: चित्रपटांची चित्रिकरण केलेली सर्व दृश्य जोडणीसाठी सज्ज असलेल्या टप्प्यातले (रफ-कट स्टेज) 6 प्रकल्प मांडणारी प्रयोगशाळा हे चित्रपट पूर्णावस्थेत नेण्यासाठी उद्योग व्यावसायिकांकडून अमूल्य अभिप्राय आणि मार्गदर्शन मिळवण्याची संधी देते.
  • पाहण्याची खोली: पूर्ण झालेले 106 माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपट, निवडक प्रतिनिधींच्या  प्रेक्षकवर्गासाठी सादर करण्याची ही एक खास जागा, वितरण आणि निधीसाठीचे सौदे करण्यासाठी संधी मिळवून देते.

या कक्षांव्यतिरिक्त हा ‘बाझार’ ‘ओपन बायर-सेलर मीट’ हा खुला विक्रेता-खरेदीदार मेळावा आयोजित करेल. यामुळे निर्मिती, वितरण (सिंडिकेशन), अधिग्रहण, वितरण आणि विक्रीमध्ये सहयोग सुलभ होईल. यातील एक समर्पित सत्र, माहितीपट निर्मिती प्रक्रिया आणि कॉर्पोरेट ब्रँडिंग यांच्यातील संबंधालादेखील वाव देईल, ज्यामध्ये फिक्कीसारख्या औद्योगिक संस्था ब्रँड वाढीसाठी आणि सामाजिक प्रभावासाठी एक साधन म्हणून सीएसआर निधीवर चर्चा करतील.

माहितीपट ‘बाझार’ हा मेळा, चित्रपट निर्मात्यांची ताकद वाढवण्यासाठी आणि आकर्षक कथा आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या अग्रभागी आणण्यासाठी वचनबद्ध आहे. यातून, सहभागींना सध्याचे कल, बाजारातील मागणी, वितरण धोरणे आणि प्रेक्षकांना काय हवे याबद्दल मौल्यवान माहिती मिळेल तसेच उद्योगतज्ञांना त्यांच्या कलाकृतींची पूर्ण क्षमता साध्य करण्यात मदत करण्यासाठी मार्मिक अभिप्राय प्रदान करेल. या मेळ्यामध्ये, महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कोऑपरेशन लिमिटेड, J&K, IDPA, सिनेडब्स इत्यादी संस्थांचे अनेक स्टॉल्स आहेत. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने श्रीलंका, बेलारूस, इराण आणि अर्जेंटिना यासारख्या देशांनाही स्टॉल्स उपलब्ध करुन दिले आहेत.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content