Homeएनसर्कलपंतप्रधान मोदी आज...

पंतप्रधान मोदी आज सहभागी होणार जी7 शिखर परिषदेत

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आमंत्रण स्वीकारून तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पहिल्यांदाच इटलीतील अपुलिया प्रांतात आज होत असलेल्या जी7 शिखर परिषदेत सहभागी होत आहेत.

काल इटलीला रवाना होताना पंतप्रधान म्हणाले की, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर माझा पहिला दौरा जी7 शिखर परिषदेसाठी इटली इथे होत असल्याचा मला आनंद आहे. जी20 शिखर परिषदेसाठी 2021मध्ये केलेल्या इटलीच्या दौऱ्याची मला आठवण होत आहे. पंतप्रधान मेलोनी यांचे गतवर्षीचे  भारताचे दोन दौरे द्विपक्षीय कार्यक्रमाला गती आणि सखोलता मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरले. भारत–इटली धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आणि हिंद-प्रशांत व भूमध्य प्रदेशांत सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

शिखर परिषदेतील सत्रांमध्ये होणाऱ्या चर्चेत कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्य प्रदेश या मुद्द्यांवर भर राहील. भारताच्या अध्यक्षतेखालील जी20 शिखर परिषदेचे फलित आणि आगामी जी7 शिखर परिषद यांच्यात समन्वय साधण्याची व ‘ग्लोबल साऊथ’साठी महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर चर्चा करण्याची ही चांगली संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content