Homeएनसर्कलरिअर ॲडमिरल डिसोझा...

रिअर ॲडमिरल डिसोझा मिलिटरी इन्स्टिट्यूटचे नवे कमांडंट

रिअर ॲडमिरल नेल्सन डिसोझा यांनी एअर व्हाइस मार्शल विवेक ब्लोरिया यांच्याकडून काल पुण्यातल्या मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेच्या कमांडंटपदाचा कार्यभार स्वीकारला. वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज तसेच गोव्यातील नेव्हल वॉर कॉलेजचे एक कुशल माजी विद्यार्थी असलेल्या रिअर ॲडमिरल डिसोझा यांनी मार्च 1991मध्ये भारतीय नौदलात रुजू झाल्यापासून अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

भारतातील तिन्ही संरक्षण दलांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रमुख तांत्रिक प्रशिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या या संस्थेचे नवीन कमांडंट म्हणून करताना रिअर ॲडमिरल, संस्थेच्या शैक्षणिक कार्यक्रमांना अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करतील. या संस्थेत सुरू असलेल्या तिन्ही संरक्षण दलांना दिल्या जाणाऱ्या

प्रशिक्षणामध्ये संयुक्तता आणि एकात्मता साधण्याच्या प्रयत्नांना चालना देतील. मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MILIT) या संस्थेत तिन्ही संरक्षण दलाच्या मध्यमस्तरीय अधिकाऱ्यांना तसेच भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशातील सैन्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

रिअर ॲडमिरल नेल्सन डिसोझा यांच्या नेतृत्त्वाखाली अत्यंत कुशल टेक्नो-वॉरियर्स अधिकाऱ्यांना घडवणे हे मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MILIT)चे उद्दिष्ट आहे. हे प्रशिक्षित अधिकारी भारतातील सशस्त्र दलांचा भविष्यासाठीचा अभ्यासक्रम तयार करतील.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content