डेली पल्स

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...

९४ वर्षीय बाबा...

माथाडी कायदा मोडीत काढणारे विधेयक व कामगारविरोधी जीआर मागे घेण्याची मागणी करत माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतीने उद्या, २६ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजल्यापासून मुंबईत आझाद...

4 मार्चपासून राज्यातल्या 100 महाविद्यालयांत कौशल्य...

महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या ‘प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान’ योजनेच्या धर्तीवर राज्यातील 100 महाविद्यालयांमध्ये 4 मार्चपासून कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून कौशल्य विकास या संकल्पनेचा...

मुंबईत उद्यापासून महासंस्कृती...

महाराष्ट्राचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्यावतीने महासंस्कृती महोत्सव 2024चे आयोजन काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदान येथे उद्यापासून 26 फेब्रुवारी, या कालावधीत...

क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल  दूरदृश्‍य प्रणालीद्वारे ईशान्येतील सात राज्यांमध्ये आयोजित खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाला संबोधित केले. या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आलेल्या...

जलसंधारण विभागातल्या भरतीसाठी...

महाराष्ट्राच्या मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यस्तर व जिल्हा परिषद यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार...

सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय  पुरस्कार ‘महावितरण’ला!

जागतिक दर्जाची तत्पर व डिजिटल ग्राहक सेवा तसेच दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेतील  आमूलाग्र सुधारणांची दखल घेत इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयपीपीएआ) महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. तसेचनवीन व नवीकरणीय ऊर्जेसाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रथम तर ग्राहकाभिमुख जनजागृतीबद्दल द्वितीय क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने महावितरणला गौरविण्यात आले. यासह वीज मिटरिंगसाठी नाविन्यपूर्ण  तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दलदेखील महावितरणला विशेष पुरस्कार देण्यात आला आहे. आयपीपीएआयच्या वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे आयोजित कार्यक्रमात पॉवर अवार्ड २०२४चे विविध  पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय विद्युत प्राधीकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय नवीन व  नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव भूपिंदरसिंग भल्ला, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष डॉ.  प्रमोद देव यांच्या हस्ते महावितरणचे मुख्य अभियंता (देयके व महसूल) संजय पाटील आणि वीज दर नियामक कक्षाचे अधीक्षक अभियंता मिलिंद दिग्रसकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले. या पुरस्कारांबद्दल  महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्व अभियंते, अधिकारी व  कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. वीज वितरण कंपनी म्हणून देशात नावलौकिक असलेल्या महावितरणने वीज क्षेत्रात पायाभूत आराखडा विकास, वीजबिलांच्या प्रक्रियेतील सुधारणा आणि जागतिक दर्जाची तत्पर ग्राहकसेवांना प्राधान्य देत  आमूलाग्र सुधारणा सुरू केल्या आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे स्वप्न मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना- २.०नुसार  साकारले जात आहे. इतर राज्यांनीदेखील या क्रांतीकारी योजनेच्या अंमलबजावणीचा अभ्यास सुरू केला आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात महावितरणने देशात मोठी आघाडी घेतली आहे.  अपारंपरिक ऊर्जा वापरामध्ये देण्यात येणारे प्राधान्य व लक्षणीय कामगिरी तसेच केंद्र शासनाच्या नवीन वनवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला १९ जानेवारी २०२२ रोजी रूफ टॉप सोलार प्रोग्रॅम फेज -२ अंतर्गत १९ जानेवारी २०२४पर्यंत दोन वर्षांमध्ये घरगुती ग्राहकांसाठी १०० मेगावॅटचे उद्दिष्ट दिले होते.  महावितरणने हे उद्दिष्ट २५ सप्टेबर २०२३ रोजी म्हणजे चार महिने आधीच पूर्ण केले आहे. महावितरणने वीज वितरण कंपनी म्हणून सुरू केलेल्या पायाभूत आराखडा विकासाच्या व ग्राहकसेवांच्या आमूलाग्र सुधारणा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात केलेली कामगिरी याची दखल घेऊन  आयपीपीएआयच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर चार पुरस्कार प्रदान करून महावितरणला गौरविण्यात आले आहे.

रामदास आठवलेंचं चाललंय...

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला जेमतेम महिना राहिला असतानाच रिपब्लिकन पार्टीचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चित्रसृष्टीशी संबंधित असलेल्या दिग्गजांच्या भेटीगाठी...

आठवड्यातून एकदा चिकन...

अवघे 200 रुपये हाती ठेऊन किंवा आठवड्यात एकदा चिकन देऊन सावकारांनी बळकाविलेल्या जमिनी सोडविण्यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019मध्ये एक समिती गठीत केली होती. या प्रयत्नांना...

गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा दांडगा...

पोलीस खात्यातील विशेषतः गुन्हा अन्व्हेषण भागातील पोलीस हवालदारांची गुन्हेगारांविषयीची माहिती शब्दबद्ध करणे गरजेचे असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राज्याचे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी नुकतेच...
Skip to content