Thursday, January 23, 2025
Homeडेली पल्सपंतप्रधान मोदींच्या सभेला...

पंतप्रधान मोदींच्या सभेला ३ लाखांहून जास्त लोकांची उपस्थिती

महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण व लाभ वितरण कार्यक्रमासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला लोटलेल्या अभूतपूर्व जनसागराने साऱ्यांचे लक्ष वेधले. या सभेला जिल्हाभरातील बचत गटाच्या महिलांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधणारी होती. यवतमाळ शहराजवळील डोरली येथे आयोजित मोदी यांच्या या सभेला जिल्ह्यातील अंदाजित तीन लाखांहून अधिक महिला, शेतकरी, युवकांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात वर्धा-कळंब रेल्वे मार्ग या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ, न्यू आष्टी-अंमळनेर रेल्वे, अंमळनेर-न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभ, पीएम किसान सन्मान निधीच्या १६व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण, यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण, आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्डचे वितरण, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वितरण, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सहा प्रकल्पांचे लोकार्पण, बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील ४५ सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण, रस्त्यांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

मोदी या सभास्थळी पोहोचताच उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. त्यांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण सभास्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मोदी यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी महिला अत्यंत शिस्तबद्ध रितीने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण कार्यक्रमाचे केलेले नियोजन उल्लेखनीय ठरले. या जाहीर कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही ही बाब प्रामुख्याने लक्षवेधी ठरली.

सभास्थळी विविध विभागांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनीही लोकांचे योजनांविषयी प्रबोधन केले. या कार्यक्रमात कलावंतांनी गीतगायन, भावगीत, आदी समाज प्रबोधनात्मक संदेशाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात पंचक्रोशीतील महिला, शेतकरी, नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

Continue reading

अजित घोष ट्रॉफी महिला क्रिकेटः साईनाथ स्पोर्ट्सला विजेतेपद

सेजल विश्वकर्मा (६४), श्रावणी पाटील (नाबाद ४७) यांच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर साईनाथ स्पोर्ट्स क्लबला ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवण्यात यश आले. त्यांनी यजमान स्पोर्टिंग युनियन क्लबचा ३५ धावांनी पराभव केला. सेजल आणि श्रावणीच्या दुसऱ्या विकेटच्या...

पं. कान्हेरे, पं. द्रविड, संजय मोने आदींना ‘दादर-माटुंगा’ पुरस्कार!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले असून येत्या रविवारी, २६ जानेवारीला सकाळी दहा वाजता केंद्रात होणाऱ्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. अरुण द्रविड,...

घोष ट्रॉफी क्रिकेटः डॅशिंग आणि स्पोर्टिंग युनियनही उपांत्य फेरीत

गतविजेत्या डॅशिंग क्रिकेट क्लबसह भामा सी. सी., साईनाथ आणि स्पोर्टिंग युनियन या संघांनी ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेतील शेवटच्या दोन साखळी लढतींमध्ये भामा सी. सी.ने डॅशिंगवर २५ धावांनी मात करत गटामध्ये अव्वल...
Skip to content