Homeडेली पल्सबँक खात्यात रुपयाही...

बँक खात्यात रुपयाही नसला तरी काढता येणार दहा हजार!

पंतप्रधान जनधन योजनेच्या (पीएमजेडीवाय) खातेदारांसाठी केंद्र सरकारची एक महत्त्वाची सुविधा पुन्हा चर्चेत आली आहे. खात्यात शिल्लक शून्य असली (म्हणजेच खात्यात पैसे नसले) तरी पात्र खातेदाराला १०,००० रुपयांपर्यंतची रक्कम काढता येते. ही सुविधा म्हणजे ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत खात्यात जमा रकमेपेक्षा जास्त पैसे वापरण्याची परवानगी. ही सुविधा आपोआप सर्वांना मिळत नाही. यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात.

जनधन योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झाली होती. तेव्हा ओव्हरड्राफ्ट मर्यादा ५,००० रुपये होती, जी नंतर वाढवून १०,००० रुपये करण्यात आली. १९ ऑगस्ट २०२६पर्यंत देशात ५९.०९ कोटी जनधन खाती उघडली गेली आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेदाराचे वय १८ ते ६५ वर्षांदरम्यान असावे लागते आणि खाते किमान सहा महिने समाधानकारक पद्धतीने चालवलेले असावे लागते. म्हणजेच खात्यात नियमित जमा-खर्च, डीबीटी किंवा इतर व्यवहार झालेले असावेत. प्रत्येक कुटुंबातील एकाच पात्र खातेदाराला, त्यातही प्राधान्याने घरातील महिला खातेदाराला ही सुविधा दिली जाते. आधारशी जोडलेल्या खात्यासाठी २,००० रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट तुलनेने सहज मिळतो, तर त्यावरील रक्कम बँक, खात्याच्या व्यवहारावरून ठरवते.

ही सुविधा मिळवण्यासाठी खातेदाराला आपल्या बँक शाखेत लेखी अर्ज करावा लागतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा पैसा अनुदान नाही, तर छोट्या कर्जाचा प्रकार आहे. तो ठराविक काळानंतर व्याजासह परत करावा लागतो. वेळेत परतफेड न केल्यास व्याज लागते आणि भविष्यातील कर्ज मिळण्यावरही परिणाम होऊ शकतो. जनधन खात्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड यापैकी एक ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा लागतो. या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट नाही. तसेच या खात्यासोबत मोफत रुपे डेबिट कार्ड, २ लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा संरक्षण आणि डीबीटी, जीवन ज्योती, सुरक्षा विमा, अटल पेन्शन यांसारख्या योजनांचा लाभही मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आता टोलनाका ओलांडतानाच तपासला जाणार गाडीचा विमा

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका ओलांडताना आता फास्टॅगद्वारे केवळ टोलच कापला जाणार नाही, तर वाहनाच्या थर्ड पार्टी विम्याची वैधताही तपासली जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)ने ही नवीन स्वयंचलित यंत्रणा सुरू केली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर...

आता ‘पीएफ’ची रक्कम घ्या नियमित हफ्त्याने

निवृत्तीनंतर पीएफचे पैसे एकाचवेळी काढायचे की हफ्त्याने घ्यायचे, हा प्रश्न आता सुटला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने गुरुवारी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी)ला मंजुरी दिली. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी)च्या २४०व्या बैठकीत...

मतदारयादीत नाव नाही? अर्ज करा ३० नोव्हेंबरपर्यंत!

महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदारयादी पुनरिक्षण (एसआयआर)चे वेळापत्रक निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा सुधारले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव संदीप कुमार यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, आता महाराष्ट्राची अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबरला नव्हे, तर मंगळवारी, २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार...
Skip to content