Saturday, October 26, 2024
Homeडेली पल्सभास्कर जाधव आणि...

भास्कर जाधव आणि आशिष शेलार यांच्यात हमरीतुमरी..

मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचा प्रभाग करण्याबद्दलचे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार यांच्यात हमरीतुमरी आणि खडाजंगी झाली.

भास्कर जाधव यांची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे, अशी झाली आहे, अशी शेरेबाजी शेलार यांनी केली तर भास्कर जाधव यांनी शेलार यांना अपशब्द वापरले. कायद्यावर, विधेयकावर किती चर्चा झाली, हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भास्कर जाधव यांनी तुमचे नेते मुख्यमंत्री असताना मुळात अधिवेशनाचे कामकाज किती दिवस झाले, हे तपासून बघावे, असे आव्हान शेलार यांनी दिले. त्यावर जाधव प्रक्षुब्ध झाले.

मंत्री उदय सामन्त यांनी त्याबद्दलचे विधेयक मांडले. त्यावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केवळ महापालिकाच नव्हे तर नगरपरिषदांसह सर्व स्थानिक संस्थांमध्ये हा बदल का करत नाही, असा सवाल केला. केवळ राजकीय स्वार्थासाठी निवडणुकांवर डोळा ठेवून हा निर्णय घेतला जात आहे, अशी टीका करत महापालिकांच्या निवडणुका कधी घेणार, असा सवालही त्यांनी केला. तसेच, न्यायालयात जाऊन या रखडलेल्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी प्रयत्न करणार का, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

हे विधेयक आणण्यामागचे कारण काय, हेतू काय, हे मंत्रिमहोदयांनी स्पष्ट करायला हवे होते. पण, त्यांनी फक्त पूर्वी तीन प्रभाग होते, ते आता चार करण्यासाठी हे विधेयक आणले आहे, असे सांगितले. पण, मुळात हे विधिमंडळ कायदे करण्यासाठीचे आहे आणि राज्यातील जनतेला घटनेनुसार अधिकार प्रदान आम्ही लोकप्रतिनिधी कायदे करून करत असतो. त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन हे आमदारांच्या फायद्यापेक्षा जनतेला काय फायदा करून देतो, यासाठी असते. त्यामुळे आज अधिवेशनाचा समारोप होईल तेव्हा किती काळ सभागृह चालले, काय कामकाज झाले, याचा आढावा अध्यक्ष मांडतील. पण, समारोपाच्या भाषणात आज अध्यक्षमहोदयांनी विधिमंडळाच्या कामकाजात प्रत्यक्ष कायदे करण्यासाठीच्या चर्चेला किती वेळ मिळाला, हेही सांगावे, असे भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर

भास्कर जाधव यांनी केवळ राजकीय भमिकेतून हे विधेयक आणले गेले आहे, अशी टीका केली. शेलार यांनी लोकशाहीत सातत्याने बदल हीच गोष्ट अपेक्षित आहे, याकडे लक्ष वेधले. नगरविकासमंत्री असताना एकनाथ शिन्दे यांना तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या चिरंजीवांनी काम करू दिले नाही, हे सांगितलेले आहे. त्यामुळे एकनाथ शिन्दे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यातील स्थितीचा आढावा पुन्हा घेतल्यानंतर त्यांना मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये चार लोकप्रतिनिधींचा प्रभाग असावा, असे लक्षात आले तर ते करणे योग्यच आहे, असे सांगून शेलार यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांनी दीर्घकालीन धोरण आखून शहरांचे विकास व्हावेत, असे सांगत या विधेयकाला विरोध केला. मंत्री उदय सामन्त यांनी सर्व सदस्यांच्या आक्षेपांना उत्तर देत विधेयकाला पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यानंतर विधेयक मंजूर करण्यात आले.

विरोधकांचा सभात्याग

अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चा शुक्रवारी दुपारी १२.२५ला अजित पवार यांच्या उत्तरानंतर संपली. त्यावेळी अर्थमंत्री पवार यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करत विरोधी पक्षांनी सभात्याग केला. ईडी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी अर्ध्या मिनिटासाठी सभात्याग केला. 

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content