Homeबॅक पेज'बाहुबली'ने पेरले ते...

‘बाहुबली’ने पेरले ते आता मोठ्याच प्रमाणावर उगवतेय!

“बाहुबली” (२०१४)ने पेरले ते आता मोठ्याच प्रमाणावर उगवतेय, असे म्हणायची वेळ आता आली आहे. साडेतीन, चार तासांचा भव्य दिव्य दिमाखदार चित्रपट (तरी म्हणे फार फार तर दोन तासांचे चित्रपट हवेत. पिक्चरमध्ये दम असेल, पटकथा बंदिस्त असेल, संवाद भारी असतील, गीत-संगीत-नृत्याची बहारदार फोडणी असेल तर साडेतीन तास बाहेरचे जग आणि हातातील मोबाईल विसरायची चित्रपटरसिकांची तयारी आहे, हे “छावा”, “धुरंधर”च्या यशाने सिद्ध केले. महागडे तिकीट काढून हे चित्रपट एन्जॉय केले, काहींनी तर दोनदा…), त्या चित्रपटात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा भरपूर वापर आणि मल्टीप्लेक्सच्या भव्य चकाचक पडद्यावर हे सगळे पाहण्याचा आनंद (आणि चित्रपट संपल्यावर फूड माॅलमध्ये रमायचे) हा आजच्या चित्रपटरसिक संस्कृतीचा ट्रेण्ड झाला आहे. तो योग्य आहे की चुकीचा आहे, हा विषयच वेगळा. ओटीटीवर जगभरातील अनेक भाषेतील चित्रपट आणि वेबसिरीज पाहायला मिळताहेत. त्यातून आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीचा चित्रपट माध्यम आणि व्यवसाय याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. माॅलमधील गेम सेंटरने त्यात सपोर्ट सिस्टीमची जणू भूमिका घेतलीय. अशा या स्थित्यंतरात जुन्या काळातील चित्रपटाच्या आठवणी, फ्लॅशबॅकमध्ये रमणे, जुन्या चित्रपटातील गाणी ऐकणं, यू ट्यूबवर पाहणं हे सुरुच राहणार आहे, ते कुठेही जात नाही की ते जपण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत.

हे सगळे घडत असतानाच २०२६मधील नवीन चित्रपटांचेही स्वागत करायला हवे. आजच्या तरुणाईला भुरळ घालण्यात ते यशस्वी ठरले तर त्यांची सोशल मीडियात भरभरून चर्चा होईल, त्यावर रिल बनतील, ती व्हायरल होतील. चित्रपटाच्या यशाचे हे नवीन परिणाम आहेत. नवीन वर्षातील सर्वाधिक अपेक्षा असलेला चित्रपट “धुरंधर २” हे वेगळे सांगायला नकोच. पहिल्या “धुरंधर”चा अजूनही हॅन्गओव्हर कायम आहे. दुसऱ्या भागातही खचाखच मारधाड, शिव्याशाप, गोळीबारी, जुन्या चित्रपटातील गाण्यांचा चपखल वापर (हे दिग्दर्शकाचे कौशल्य, करामत, कसब) हे सगळे असेलच. चित्रपटावर काही उलटसुलट प्रतिक्रिया येतीलच. (पन्नास वर्षे पूर्ण होऊनही “शोले”वर काही भलत्याच काॅमेन्टस येतात. ते तर होणारच आहे. सोशल मीडियावर कोणीही कसेही व्यक्त होते म्हटल्यावर हे सगळे घडत राहणारच. तेवढाच तो चित्रपट फोकसमध्ये राहतो.) “धुरंधर”मधील देशभक्तीचा वेगळा पैलूही काहींना कौतुकाचा वाटला.

नवीन वर्षातील आणखी एक चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण आहे, शाहरुख खानचा “किंग”. तो पहिल्या पोस्टरपासूनच लक्षवेधक ठरलाय. चित्रपटाचे नाव, त्याचं पोस्टर, टीझर आणि ट्रेलर ही एकेक महत्त्वाची पायरी. एसआरके त्यात स्मार्ट आहे. तो केवळ चित्रपटात काम करुन थांबत नाही. तो आपला चित्रपट एक प्राॅडक्ट आहे आणि त्याचं प्रमोशन व मार्केटिंग योग्य दिशेने व्हायला हवं यावर त्याचं विशेष लक्ष असते.‌ याची सुरुवात त्याच्या चित्रपटाच्या पहिल्या पत्रकार परिषदेपासून होते. आपल्या चित्रपटाच्या पथ्यावर नेमकं काय पडेल यासाठीचा त्याचा माईंड मॅप अतिशय फोकस्ड असतो. शाहरुख खान १९९२पासून चित्रपटाच्या पडद्यावर आहे आणि आजही तो तितकाच लोकप्रिय आहे, ते उगीच नाही. कार्पोरेट युगातील सेलिब्रिटी आहे. गल्ला पेटीवरील “किंग” आहे.

२०२६मधील आणखी महत्त्वाचे चित्रपट आहेत, “बाॅर्डर २”. हा युद्धपट (१९९७च्या पहिल्या “बाॅर्डर”च्या तुलनेत चित्रपटाने बरीच तांत्रिक प्रगती केली असल्याचे यात दिसेल.), दृश्यम २ (रहस्य रंजक वळणावर हा चित्रपट आपल्याला नेतो. पहिल्या दोन भागाचा अनुभव आहे.), वेलकम टू जंगल (मसालेदार मनोरंजनाचा खजाना. असे चित्रपट डोक्याला ताप न‌ देता, बोली भाषेत शाॅट न देता एन्जॉय करायचे असतात हे पब्लिक जाणून आहे.) याशिवाय टाॅक्सिस, बेटल ऑफ गलवान, द राजा साब, आवारापन २, लव्ह ॲण्ड गाॅड , स्पीरिट असे अनेक चित्रपट पडद्यावर येताहेत. पॅन इंडिया चित्रपटाचे युग आहे. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट तिकडच्या सर्व प्रादेशिक भाषेसह हिंदीत डब होऊन दणक्यात प्रदर्शित होणार. इंग्रजी भाषेतील चित्रपट हिंदीतही डब करून येणार.

हे सगळे घडत असतानाच आपले वैशिष्ट्यपूर्ण असे अनेक मराठी चित्रपटही प्रदर्शित होत आहेत. त्याची सुरुवात हेमंत ढोमे दिग्दर्शित “क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम” या चित्रपटाने झाली आहे. मराठी माध्यमाच्या शाळा वाचवा हे सांगण्यासाठी या चित्रपटात मनोरंजन आणि प्रबोधन यांचा उत्तम मेळ साधला आहे. मराठी चित्रपट आशयाच्या बाबतीत सरस असतो हे या चित्रपटात दिसतं. उगाच कसलाही आरडाओरडा करत कसलेच मुद्दे आणि गुद्दे मारले नाहीत. हा चित्रपट कळतनकळतपणे खूप काही सांगतोय. मराठी चित्रपटासाठी नवीन वर्षाची सुरुवात झक्कास झाली आहे. वर्षभरात किमान शंभर मराठी चित्रपट प्रदर्शित होतील. चित्रपटमाध्यम आणि व्यवसाय यांची वाटचाल सुखदपणे सुरुच राहणार आहे, मग तो मराठी असो वा हिंदी. किंवा साऊथचा धमाकेदार!

Continue reading

सतना कारागृह! गोष्ट येथे संपतच नाही!!

ही बातमी तुम्हालाही माहित्येय. कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल अथवा लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो, असे पारंपरिक समजूतदारपणाचे वाक्य बोलून तुम्ही दुसऱ्या बातमीकडे वळला असाल... मध्य प्रदेशमधील सतना कारागृहातील ज्येष्ठ जेलर अधीक्षक फिरोजा खान हिची त्याच कारागृहातील...

रणवीरने चित्रपट सोडला म्हणून इतका गहजब?

'डाॅन ३'च्या चित्रिकरणास सुरुवात होण्याच्या अवघ्या दहा दिवस अगोदर रणवीर सिंगने चित्रपट सोडल्याने दिग्दर्शक फरहान अख्तरचे चिडणे आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्लाॅईज या चित्रपटसृष्टीतील संघटनेने रणवीर सिंगवर तीन वर्षांची बंदी घालण्याचे आवाहन करताच त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटणे...

साठीतल्या सलमानमध्ये अजूनही रागवण्याचे ‘स्पिरीट’!

राग आला रे आला की सोशल मीडियात, विशेषतः इंस्टाग्रामवर पोस्ट करणे हे आजच्या सेलिब्रिटीजचे वैशिष्ट्य. त्यांना एखाद्या इव्हेंटसमध्ये जरा कुठे कशाचा तरी राग आला अथवा कोणाकडे रागाने पाहिले न पाहिले तरी तमाम इन्फ्लूअन्सर्स त्याचं काही सेकंदाचे रिल सोशल मीडियात...
Skip to content