Homeकल्चर +प्रेम नाम है...

प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा..

“प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा..” हा डायलॉग आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर ओळख मानली जाते. अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रेम चोपडा यांनी खलनायकाच्या भूमिका करतानादेखील आपल्या वेगळ्या शैलीने चाहत्यांचे प्रेम मिळवले. पण काळाच्या ओघात वय वाढले, तब्येत खालावली आणि एकेकाळी ज्यांच्या घराबाहेर गर्दी असायची, त्या कलाकाराच्या आयुष्यात एकटेपणाची सावली दिसू लागली. अशावेळी ज्येष्ठ कलाकारांची विचारपूस करणे, त्यांच्या अनुभवांचा सन्मान करणे आणि त्यांच्या मानसिक आधारासाठी वेळ देणे ही केवळ औपचारिकता नसून सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आहे, या जाणिवेतून सामाजिक कार्यकर्ते के. रवि यांनी आपले जवळचे मित्र गायक. संदीप कुमार यांच्यासह प्रेम चोपडा यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या आरोग्य, मानसिक स्थिती आणि आयुष्याबद्दलच्या भावना समजून घेतल्या.

आजच्या धावपळीच्या आणि चमकधमकीच्या जगात माणुसकी हरवत चालली आहे, असे अनेकदा म्हटले जाते. विशेषतः चित्रपटसृष्टीत, जिथे यश, प्रसिद्धी आणि व्यस्तता यांच्यामध्ये मानवी भावना कधीकधी मागे पडतात. मात्र अशा वातावरणातही काही व्यक्ती आपल्या कृतीतून संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा जिवंत आदर्श समाजासमोर ठेवतात. अशीच ही एक भावनिक भेट होती. ही भेट फक्त “भेट” नव्हती, तर एका विशिष्ट कलाकाराला पुन्हा जगण्याची उमेद देणारा मानवी संवाद होता. चर्चेदरम्यान बॉलीवूडमधील बदलते वातावरण, नवीन पिढी, सिनेमा आणि समाज यावर मनमोकळ्या गप्पा झाल्या. जुन्या आठवणी, अभिनयातील अनुभव आणि आजच्या काळातील चित्रपटसृष्टीतील बदल यांवर चर्चा करताना प्रेम चोपडा भावूक झाल्याचेही पाहयला मिळाले.

यावेळी के. रवि यांनी त्यांना सध्या तयार होत असलेल्या “s रेवती” या शॉर्ट फिल्मविषयी माहिती दिली. या चित्रपटाचा आशय, सामाजिक संदेश आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारी भूमिका याबद्दल सांगताना त्यांनी प्रेम चोपडा यांना या प्रकल्पाशी भावनिकरित्या जोडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, “तुमचा अनुभव आणि तुमचे आयुष्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे,” असे सांगत त्यांनी प्रेम चोपडा यांच्यामध्ये पुन्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. कधीकधी औषधांपेक्षा शब्द मोठे काम करतात. एखाद्या आजारी व्यक्तीला “तुम्ही महत्त्वाचे आहात”, “लोकांसहित आम्ही अजूनही तुमच्यावर प्रेम करतो”, “तुमचे अनुभव समाजाला आवश्यक आहेत” हे जाणवून देणे म्हणजेच त्याला नव्याने जगण्याची प्रेरणा देणे होय. के. रवि यांनी नेमके हेच काम केले.

प्रेम चोपडा यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांनी भारतीय सिनेमाला जे योगदान दिले आहे, त्याचा सन्मान केवळ पुरस्कारांनी होत नाही; तर त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना आधार देऊन आणि त्यांना समाजाशी जोडून ठेवून होतो. आज सोशल मीडियावर फोटो टाकणे, प्रसिद्धी मिळवणे किंवा चर्चेत राहणे सोपे झाले आहे; पण एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणे हे खरे कार्य असते. प्रेम चोपडा यांना दिलेली ही भावनिक साथ आणि सकारात्मक संवाद फक्त एक प्रसंग नसून, “माणुसकी अजून जिवंत आहे” याचा सुंदर संदेश आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content