Homeकल्चर +रिमेक बनवताय? सावधान!...

रिमेक बनवताय? सावधान! जेन झी बघतोय!!

तुम्बाडची मंजुळा पाहणाऱ्या काही जणांनी लगोलग समाजमाध्यमावर म्हटलं, हा मराठी चित्रपट ‘सु फ्राॅम सो’ या लोकप्रिय कन्नड चित्रपटाची रिमेक आहे. कोणी म्हणालं, अगदी असाच हा चित्रपट आहे (खरंच का), तर कोणी म्हणालं, मूळ गोष्टीला कोकणच्या पार्श्वभूमीवर अगदी छान मांडलंय. यावरुन आपण गोंधळात न पडता ओटीटीवर तो मूळ कन्नड चित्रपट पाहून तुलना करावी. पण खरा प्रश्न पुढेच आहे. आज आपल्या देशातील विविध भाषांतील चित्रपटांना इंग्रजी सबटायटल्स असतात (पूर्वी अशी सबटायटल्स महोत्सवात सहभागी होत असलेल्या चित्रपटांना असत). ती वाचायची, त्याचा अर्थ लावायचा आणि दृश्य पाहयचे यात तशी तारांबळ उडते. पण सवयीने काही गोष्टी सवयीच्या होतात. दुसरं म्हणजे ओटीटीवर जगभरातील अनेक देशांतील विविध भाषांतील चित्रपट, वेबसिरीज घरबसल्या पाहयला मिळताहेत. एकूण काय, आता ऐंशीच्या दशकात जसं कमल हसनची दुहेरी भूमिका असलेल्या ‘ओरु कैथरिन डायरी’ या
तमिळ चित्रपटाच्या मूळ चित्रपटाचा दिग्दर्शक के. भाग्यराज यांनी हिंदीत रिमेक करताना अमिताभ बच्चनला दुहेरी भूमिका देत ‘आखरी रास्ता’ (१९८६) बनवला आणि तो मूळ चित्रपट फक्त आणि फक्त तमिळ भाषिकांनीच पाहयला असल्याने आपल्याला ‘आखरी रास्ता’ एकदम भारी चित्रपट वाटला, असे आजच्या सबटायटल्स आणि ओटीटी युगात वाटत नाही.

विशेषतः कोरोनाच्या काळात अन्यभाषिक चित्रपट, वेबसिरिज पाहणारा मोठाच वर्ग निर्माण झाला आणि‌ त्यांनी मूळ चित्रपट पाहिला असल्याने त्यांना रिमेकचे कौतुक राहिलेले नाही. गरज आहे ती, मूळ चित्रपटाचे कथासूत्र अथवा थीम (जर्म) घेऊन ती आपल्या भाषेतील चित्रपट संस्कृतीत साकारणे. वसंत सबनीस यांची खुमासदार शैलीतील पटकथा असलेल्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाची मुळं ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘बिवी और मकान’ या चित्रपटात आहेत. पण अशी ही बनवाबनवी, आजही कुठूनही कितीदाही पाहवा. आपण त्याचा मनसोक्त मनमुराद आस्वाद घेतो, रिमेक अशी हवी. ती रिमेक वाटता कामा नये. पूर्वी इंग्रजी चित्रपटाची रिमेक करण्याचे फॅड होते. मूळ इंग्रजी भाषेतील चित्रपट

प्रामुख्याने मोठ्या शहरांतील उच्चभ्रू वर्ग‌ पाहयचा. त्याची हिंदीत रिमेक केली तर ती नक्कीच यशस्वी ठरेल असे वाटे. शम्मी कपूरने नायकपदाची सद्दी संपल्यावर इर्माला डूस, या हाॅलिवूडपटाची ‘मनोरंजन’ या नावाने रिमेक केली. पण त्यातलं कथानक हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांना अजिबात रुचले नाही. त्यामुळे हा चित्रपट फर्स्ट डे, फर्स्ट शोलाच फ्लाॅप ठरला. ऐंशीच्या दशकात जितेन्द्र बराच काळ हैद्राबादला मुक्कामाला असे आणि प्रत्येक शनिवारी दुपारी प्रकाशित होत असलेल्या ट्रेड पेपर्समधील तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम भाषेतील चित्रपटाच्या उत्पन्नावर नजर टाके आणि ज्याचे आकडे मोठे, त्या चित्रपटाची हिंदीत रिमेक करत असे. त्यात काही गमतीजमती घडत. ‘हिम्मतवाला’ या चित्रपटाच्या मूळ तेलगू भाषेतील चित्रपटात जयाप्रदा होती. हिंदीत रिमेक करताना श्रीदेवी आली.

आजच्या डिजिटल पिढीला अन्यभाषिक चित्रपट, वेबसिरिजचे अजिबात वावडे नाही. कन्नड असो, तमिळ असो वा अगदी युरोपियन, अमेरिकन देशातील चित्रपट असो, ‘पाण्या’सारखे काय काय आहे हे त्यांना जास्त माहित आहे. जेन झी पिढीकडून अशी बरीच माहिती मिळतेय. आणि तीच पिढी आता अमूकतमूक चित्रपटाची पाळेमुळे सहज खोदून काढू शकतात. तेव्हा काॅपी टू काॅपी करण्यापेक्षा त्याला नवं रुपडे द्या, नवीन झबले शिवा, नवीन कपडे घाला. रंग रुप द्या. आपल्या भाषेत रिमेक पडद्यावर आणा, चित्रपटरसिक नक्कीच स्वागत करतील. आजचा चित्रपटरसिक अधिक चौकस आहे, तो उगाच कोणताही चित्रपट पाहयला वेळ, पैसा आणि शक्ती खर्च करत नाही. एवीतेवी मल्टीप्लेक्समध्ये तिकीटदरही फार भारी आहेत…

(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

सलमानचं ‘ते’ रुपडं आहे तरी कसलं द्योतक?

दादा कोंडके द्वैअर्थी संवादासाठी ओळखले जात होते तरी कधीकधी ते एखादं सत्य सहज बोलून जात असत. दादा कोंडके यांच्या कामाची एक पद्धत होती. आपला चित्रपट पूर्ण झाल्यावर ते मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना गोव्याला फिरायला नेत. या प्रवासात ते जे...

कोईम्बतूरला रंगला ट्रेलर लाँच आणि मग …

जग जवळ आले आहे हे आता बोलायची, सांगायची, ऐकायची गरज नाही. ते घडताना दिसतेय. आता तुम्हीच बघा ना, तमिळनाडूच्या कोईम्बतूरला दिग्दर्शक कृष्णकुमार रामकुमार यांच्या 'जी डी एन' (नायडू) या मल्याळम चरित्रपटाचा रंगतदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडतोय न पडतोय...

शाहरुख खानच नव्हे तर अनेक ‘हिंदी’वाल्यांनी दिली ‘मराठी’ला साथ!

सोशल मीडियावर सर्वाधिक लक्षवेधक चर्चा आहे ती, एसआरकेने अर्थात शाहरुख खानने दे‌ऊळ बंद-२ची. त्याच्या रेड चिली या कंपनीने डिजिटल काॅपीच्या पैशासाठी अडवणूक न करता चित्रपटप्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला याची.‌ देऊळ बंदचा सर्वेसर्वा प्रवीण तरडे यानेच ही गोष्ट सांगितली आणि...
Skip to content