Homeमाय व्हॉईसगोष्ट तुकडा पडलेल्या...

गोष्ट तुकडा पडलेल्या एका सफरचंदाची!

सफरचंदाचा एक तुकडा कोणीतरी दातांनी चावून तोंडात टाकल्यावर उरलेले सफरचंद जसे दिसते ते आहे एपल कंपनीचे प्रतीकचिन्ह. एक ट्रिलियन डॉलर्स एव्हढी महाराष्ट्राचीही अर्थव्यवस्था झालेली नाही. तो टप्पा गाठणे हे सध्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे ध्येय्य आहे, प्रयत्न आहे. आणि तितके बाजारमूल्य एपल कॉर्पोरेशनने 2018मध्येच गाठले होते. एक ट्रिलियन म्हणजे एक लाख कोटी डॉलर्स. रुपयात सध्याच्या किंमतीत होतात रु. चौऱ्याण्णव लाख कोटी रुपये! हा आकडा आहे आठ वर्षांपूर्वीचा. 2025च्या ऑक्टोबरमध्ये एपलचे बाजारमूल्य चार ट्रिलियन डॉलर्स म्हणजे, तीन कोटी साठ लाख इतके कोटी रुपये झाले आहे. थोडक्यात काय तर जगातील बाजारमूल्य तसेच व्यापारात एक क्रमांकाची कंपनी आहे एपल आयएनसी. या विशाल अशा आर्थिक क्षमतेच्या खाजगी कंपनीत झालेला बदल म्हणूनच जगासाठी लक्षणीय ठरतो. एखाद्या पुढारलेल्या देशाचे अध्यक्ष, पंतप्रधान बदलताना जशी चर्चा माध्यमांत रंगते, तसेच या खाजगी कंपनीतील नेतृत्त्वबदलामुळे सुरु झाले आहे.  सध्या त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे टिम कुक पायउतार होतील. ते कार्यकारी अध्यक्ष या पदावर जातील व त्यांच्या जागी एपलची भविष्यातील वाटचालीची धोरणे ठरवणे, सध्याचा दैनंदिन कारभार संभाळणे ही जबाबदारी जॉन टर्नस यांच्याकडे सोपवण्यात येत आहे. हा बदल सप्टेंबरपासून अंमलात येईल.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांत हा जगातल्या तंत्रज्ञानाची फक्त राजधानीच नाही तर संगणकीय शास्त्रातील सर्व महत्त्वाची संशोधने, शोध इथेच लागल्याने संगणकयुगाचा पाळणाच इथे हालला असे म्हटले तर तरे वावगे ठरू नये. इथे भारतीय आणि चिनी वंशाची मंडळी मोठ्या प्रमामात राहतात, स्थायिक झालेली आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जिल्ह्यांप्रमाणेच देशाच्या सर्व राज्यांतील हुषार तरूण अभियंत्यांचा अमेरिकेतील मुक्काम बहुधा कॅलिफोर्नियातच होत असतो. इथे क्युपर्टीनो गावात एपलचे जागतिक मुख्यलय एपल पार्क वसलेले आहे. 1976मध्ये विद्यापीठातून बाहेर पडलेल्या तरूण अभियंत्यांनी स्टीव्ह जोब्ज, स्टीव्ह वोझनिक आणि रोलँड वायने यांनी एपल काँप्युटर कंपनीची स्थापना केली. जोब्ज व वोझनिक यांनी त्याचे कॉर्पोरेशनमध्ये रुपांतर केले तेव्हा नाव ठेवले एपल काँप्युटर आयएनसी आणि 2007मध्ये ती बनली एपल आयएनसी. वोझनिकने संशोधित केलेला एपल 1 व कालांतराने एपल 2 हे व्यक्तीगत वापराचे लहान (मायक्रो) काँप्यूटर एपलने बाजारात आणले.

सफरचंद

अनेक ठिकाणी होते त्याप्रमाणे जोब्ज व वोझनिक यांचे व्यावसायिक मतभेद झाले. ते टोकाला पडल्यानंतर दोघेही मूळ कंपनीतून वेगळे झाले. जोन स्कली हा एपलचा सीइओ म्हणून कारभार करत होता तर जोब्जने नेक्स्ट नावाची स्वतःची कपंपनी सुरु केली. पण दहा वर्षांतच एपलची अवस्था वाईट झाली. कंपनी बंद करण्याची स्थिती येण्याची शक्यता होती. तोटा वाढत होता अशा टप्प्यावर स्कलीने पुन्हा जोब्जला एपलमध्ये येण्याची विनंती केली. एपलने नेक्स्टचे सारे भागभांडवल विकत घेऊन डोब्जच्या हाती एपलची सूत्रे सोपवली. 1997मधील या घटनेनंतर मात्र एपलने मागे वळून कधीच पाहिले नाही. पुढच्या पंधरा वर्षांत जोब्जने एपलला नव्या उंचीवर आणून ठेवले. त्यांनी आणलेला एपल फोन प्रचंड लोकप्रिय ठरला. एपल फोनचे नवे मॉडेल बाजारात येण्याच्या दिवशी पहाटेपासून एपल स्टोअरबाहेर रांगा लागतात, हे दृष्य तेव्हापासून आजतागायत कायम आहे. प्रकृतीच्या कारणासाठी 2007मध्ये जोब्जने अध्यक्षीय भूमिका घेतली आणि डॉम कुक यांच्याकडे मुख्याधिकारी म्हणून एपलची सूत्रे सोपवली.

2011मध्ये जोब्जने कंपनीतून निवृती घेतली आणि लवकरच त्यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. एपलमध्ये कुकनी अनेक नवीन गोष्टी केल्या. त्यात अमेरिकेतील प्रचंड खर्चिक ठरणारे एपल फोनचे कारखाने बंद करून चीनमध्ये एपल फोनचे उत्पादन सुरु करण्याचे धोरण टीमने आखले व राबवले. तोवर अमेरिकन उत्पादनांची प्रत्यक्ष निर्मिती परदेशात करण्याची प्रथा रुजलेली नव्हती. त्यादृष्टीने एपल कंपनी धोरणात्मक बदल करणारी पहिली कंपनी ठरली. एपल फोनच्या उत्पादन व पुरवठा साखळीचे नेटके नियोजन करून कमीतकमी गुंतवणुकीत जास्तीतजास्त नफा मिळवण्याची कुक यांची हातोटी कॉर्पोरेट विश्वात वाखणली गेली. त्यांचा भर नव्या उत्पादनांच्या संशोधनावर होता. एपेल उत्पादन परिपूर्ण आणि ग्राहकाला वापराच्या दृष्टीने अतिशय सोपे राहिले पाहिजे यावर त्यांचा भर राहिला. कुक यांनी कंपनीच्या उत्पादनपद्धतीत आमूलाग्र बदल करून जोब्जचा नाविन्याच्या संशोधनाचा वापर पुढे नेतानाच प्रचंड नफ्यातील कंपनी उभी केली. आजचे विशाल भांडवली स्वरूप ही कुक यांची एपलला देणगी आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये.

(लेखक अनिकेत जोशी ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

सत्तेपाठोपाठ ममतांची तृणमूलवरची पकडही गेली!

देशाच्या राजकारणात तब्बल पन्नास वर्षांनंतर अशी स्थिती आली आहे की, पश्चिम बंगाल आणि दिल्लीत एकाच पक्षाचे राज्य आले आहे. १९७७मध्ये पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे नेते सिद्धार्थ शंकर रे, हे मुख्यमंत्री होते तर दिल्लीत इंदिरा गांधींचे काँग्रेसचे राज्य सुरु होते. त्यानंतर...

पुस्तक पानसरेंचे, थयथयाट गायकवाडांचा! महाराज वेठीला!!

कम्युनिस्ट विचारवंत व लेखक गोविंद पानसरेंनी ८०च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक पुस्तिका प्रकाशित केली. पंच्याहत्तर पानी सुधारित आवृत्तीची किंमतही फक्त पाच रुपये ठेवली होती. पहिली आवृत्ती हातोहात विकली गेल्यानंतर पहिल्याच वर्षी १९८८मध्ये तीन वेळा पुस्तक छापले गेले. नंतर...

बंगालमध्ये यावेळी भाजपाने घातली नाही ‘दीदी’ला साद!

येत्या गुरुवारी बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडेल आणि त्यानंतरच्या बुधवारी, २९ एप्रिलला दुसऱ्या व अंतिम टप्प्याच्या मतदानाने निवडणूक संपेल. तेथील २९४ जागांमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेत १४९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. तृणमूलचा पराभव करून ही...
Skip to content