Homeमुंबई स्पेशलएलआयसीची ग्राहक आणि...

एलआयसीची ग्राहक आणि एजंटसाठी दोन स्वतंत्र मोबाईल ॲप लॉन्च!

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी काल मुंबईत एलआयसीचे नवीन ग्राहक ॲप (मायएलआयसी) आणि विक्री मध्यस्थांसाठीचे (एजंट) मोबाईल ॲप (सुपर सेल्स साथी) यांचे अनावरण केले. 26 कोटींहून अधिक पॉलिसी आणि भारतातील सर्वात व्यापक विमा पदचिन्हासह एलआयसीची ॲप्स आता बदलत्या जीवन विमा बाजारपेठेतली व्याप्ती वाढवण्यासाठी, सेवेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी तसेच स्पर्धात्मक दुनियेत राहण्याकरीता कार्यरत असतील. एलआयसी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आर. दोराईस्वामी, व्यवस्थापकीय संचालक दिनेश पंत, रत्नाकर पटनायक, आर. चंदर आदी यावेळी उपस्थित होते.

‘मायएलआयसी’ ॲप पॉलिसी सर्व्हिसिंग, क्लेम सपोर्ट, पेमेंट्स, डॉक्युमेंटेशन आणि कस्टमर एंगेजमेंट, या सर्वांना एकाच, सहजसोप्या 360-डिग्री डिजिटल अनुभवात एकत्र आणते. हे ॲप कागदपत्रांचे काम पूर्णपणे काढून टाकण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करते. पॉलिसीधारकांना त्यांच्या आर्थिक संरक्षणाच्या प्रवासाची सूत्रे स्वतःच्या हातात घेण्यास सक्षम करते. ‘सुपर सेल्स साथी’ ॲप एलआयसीच्या एजंटना विपणन दूरदृष्टी, कामगिरीचा वेध, ग्राहकांची वैशिष्ट्ये आणि पॉलिसी सर्व्हिसिंगसाठी असलेल्या डिजिटल साधनांच्या माध्यमातून अधिक कार्यक्षमतेने आणि आत्मविश्वासाने सेवा देण्यासाठी सक्षम करते. 

‘मायएलआयसी’चे फायदेः

विमा पोर्टफोलिओ एकाच ठिकाणी पाहा आणि व्यवस्थापित करा

प्रीमियम त्वरित भरा

पॉलिसीच्या लाभांचा रिअल-टाइममध्ये मागोवा घ्या

पेपरलेस पॉलिसी कर्जाचा लाभ घ्या

पॉलिसी ऑनलाइन अपडेट करा

कालबाह्य झालेल्या पॉलिसी ऑनलाइन पुनरुज्जीवित करा

ऑनलाइन पॉलिसी शोधा आणि खरेदी करा

जलद, सुरक्षित आणि कागदविरहित ई-केवायसी

‘सुपर सेल्स साथी’चे फायदेः

डिजिटल विक्री साधने

पॉलिसीच्या स्थितीचा रिअल-टाइम मागोवा

फॉलो-अपसाठी स्वयंचलित स्मरणपत्रे

ग्राहकांशी एकात्मिक संवाद

ग्राहक मूल्यवृद्धीसाठी एआय-चालित सूचना

प्रवासात सादरीकरणासाठी डिजिटल सेल्स किट्स आणि उत्पादन स्पष्टीकरणे

लक्ष्य आणि कामगिरीचे निरीक्षण करण्यास मदत करणारे कामगिरी डॅशबोर्ड

Continue reading

समृद्ध स्वतंत्र भारत, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न

भारतीय संतपरंपरेने अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन, समता आणि मानवतेची मूल्ये जपली आहेत. या परंपरेला आधुनिक राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विसाव्या शतकातले एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्य मिळविणे हे राष्ट्रनिर्मितीचे अंतिम उद्दिष्ट नसून, स्वतंत्र भारताला समताधिष्ठित, स्वावलंबी, एकात्म आणि समृद्ध...

‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या गाण्यांचे लोकार्पण

मुंबईतल्या बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने नुकतेच ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले', या दोन मराठी गाण्यांचे लोकार्पण सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजिवासनसारख्या...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किंमत शून्य…

भीमाशंकर-कर्जत येथील टोरंट पॉवरच्या 3000 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कर्जत पोलीस ग्राउंडवरील सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात काय करायचे, काय नाही, हे सगळे दिल्लीतून ठरते,...
Skip to content