Homeचिट चॅटॲड. मितांशु पुरंदरे...

ॲड. मितांशु पुरंदरे मुंबई भाजपच्या लीगल सेलचे सरचिटणीस

मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. मितांशु पुरंदरे यांची मुंबई भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) लीगल सेलचे सरचिटणीस म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी एका शानदार कार्यक्रमात ॲड. मितांशु पुरंदरे यांना याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान केले.

ॲड. अमितकुमार मेहता या लीगल सेलचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन ॲड. मितांशु पुरंदरे यांचे स्वागत केले. यावेळी मितांशु यांचे वडिल, ज्येष्ठ पत्रकार राजेश पुरंदरे, आई, प्रथितयश डॉक्टर स्नेहा पुरंदरे, मुंबई भाजपच्या प्रवक्त्या श्वेता परुळकर, ॲड. अनिकेत निकम आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड. मितांशु पुरंदरे यांनी वकिलीची पदवी प्राप्त केल्यानंतर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कायद्याचा अधिकाधिक अभ्यास केला. ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी सातत्याने त्यांना आवश्यक ते सहकार्य केले आहे.

Continue reading

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची...

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...
Skip to content