Homeकल्चर +‘उधार का उजाला’चे...

‘उधार का उजाला’चे गुरुवारी प्रकाशन

सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’, या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतल्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि या कवितासंग्रहाचे प्रकाशक संदीप चव्हाण यांनी ही माहिती दिली.

या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि साहित्यिक विनय हर्डीकर असतील. ज्येष्ठ कवी आणि अभिनेते किशोर कदम, तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. ‘उधार का उजाला’, या कवितासंग्रहाच्या प्रकाशनानिमित्ताने काव्यरसिकांसाठी विशेष काव्य अभिवाचनाचेही आयोजन करण्यात आले आहे. सुनील कांबळे, राजेश शिरभाते आणि सानिका गोडसे हे या पुस्तकातील निवडक कवितांचे अभिवाचन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे करणार आहेत.

संवेदनशील भावविश्व मांडणाऱ्या ‘उधार का उजाला’च्या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी आणि काव्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन सदामंगल पब्लिकेशनतर्फे करण्यात आले आहे.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content