Homeडेली पल्समुंबईत अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन...

मुंबईत अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उद्यापासून

मुंबई महानगरातील नागरिकांना आरोग्याशी संबंधित सुलभ सेवा देण्यासाठी मुंबई महापालिकेने तंत्रज्ञानस्नेही पाऊल टाकले आहे. पालिकेकडून लवकरच भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित ‘’स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली (ऍप्लिकेशन)’’ सेवा सुरु करण्यात येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून मुंबई महापालिका संचालित स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली / ऍप्लिकेशन उद्या, शनिवार १९ जुलै २०२५पासून पालिकेचे संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in वर नागरिकांसाठी, ‘अर्ज करा’ या सदरात उपलब्ध होणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने खालील सुविधा उपलब्ध

  • निधन झालेल्या / मृत व्यक्तीच्या स्थानापासून ५ किलोमीटर परिसरांतील अथवा निवडीद्वारे संपूर्ण मुंबई महानगरांतील स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेळ नोंदणी (स्लॉट बुक) करणे.
  • स्मशानभूमी व्यवस्थापनाद्वारे स्मशानभूमी / दफनभूमीमधील उपलब्धता पाहणे.
  • नागरिकांच्या प्रथेनुसार स्मशानभूमी / दफनभूमी निवडीचा पर्याय.
  • अंत्यसंस्काराच्या नोंदणीची माहिती, त्यात बदल करणे किंवा रद्द झाल्यास माहिती लघुसंदेश अर्थात ‘एसएमएस’द्वारे प्राप्त होणे अंत्यसंस्काराची नोंदणी केल्यानंतर, तयार होणाऱ्या नोंदणी क्रमांकामुळे, नोंदणीची खात्रीलायक माहिती नागरिकांना प्राप्त होणार आहे. नोंदणी केलेल्या वेळेमध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी / दफनभूमीवर पोहोचणे शक्य न झाल्यास नोंदणी केलेला कालावधी हा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून इतरांकरिता प्रणालीमध्ये उपलब्ध केला जाईल. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना या प्रणालीच्या माध्यमातून वेळेचे नियोजन करणे सोपे होईल. तसेच स्मशानभूमीतील कार्यरत कर्मचा-यांसमवेत समन्वय साधण्याकरिता ही प्रणाली उपयुक्त ठरेल.

नागरिकांना ऑनलाईन सुविधेबरोबरच, प्रचलित पद्धतीनुसार म्हणजेच स्मशानभूमी / दफनभूमी येथे अंत्यसंस्काराची नोंदणी करण्याची (ऑफलाईन) सुविधादेखील उपलब्ध असेल, असे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content