Homeन्यूज ॲट अ ग्लांसवरळीत कोटक कुटुंबाने...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली इमारतीत ही खरेदी करण्यात आली आहे. या मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ 7,418 चौरस फूट आहे. या व्यवहारासाठी 12 कोटींहून अधिक स्टॅम्प ड्युटी आणि त्यासोबत अंदाजे साडेतीन लाख रुपये नोंदणीशुल्क भरले गेले आहे, असे समजते.

उदय कोटक यांनी सप्टेंबर 2023पर्यंत कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून काम पाहिले आहे. आजही त्यांचा बँकेत सुमारे 25% हिस्सा आहे. वरळी सी

फेसवरील या इमारतीत कोटक कुटुंबाने एकत्रित 12 अपार्टमेंट फ्लॅटस् खरेदी केले आहेत, ज्याची किंमत प्रति चौरस फूट 2.71 लाख रुपये इतकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक व्यवहार अधिकृतपणे 30 जानेवारी रोजी नोंदणीकृत झाले तर 5 फेब्रुवारी रोजी एक अतिरिक्त व्यवहार नोंदवण्यात आला.

कोटक यांनी शिव सागर इमारतीत खरेदी केलेले हे अपार्टमेंट फ्लॅट्स तळमजला, पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर आहेत. या फ्लॅट्समधून अरबी समुद्र आणि मुंबई कोस्टल रोडचे दृश्य दिसते. अनेक प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्ती या परिसरात राहतात. कोटक यांनी खरेदी केलेल्या या 12 फ्लॅट्सचा कार्पेट एरिया 173  ते 1,396 चौरस फूट आहे. ही जागा एकूण 7,418 चौरस फूट आहे. 2018मध्ये, उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने आता बंद पडलेल्या वाइन कंपनी इंडेज विंटनर्सचे कार्यकारी संचालक रणजित चौगुले यांच्याकडून वरळी सी फेस येथे एक प्रशस्त बंगला 385 कोटी रुपयांना विकत घेतला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे 12 नवीन फ्लॅट्स या बंगल्याशेजारील इमारतीत आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content