Homeचिट चॅटमुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या स्पर्धेत विजेतेपदाचा मान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने अबाधित ठेवला आहे.

लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव माणिक पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी स्थानिक आमदार सना मलिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मोहिते, जयप्रकाश अग्रवाल, लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुबोध आचार्य, हरिश्चंद्र गवस, हिरा मोराळे, डॉ. महेंद्र चेंबूरकर, सचिव मोहन बामणे, आंतरराष्ट्रीय पंच मंदार म्हात्रे यांनी स्पर्धेला उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. देव स्पोर्ट्स अॅकॅडमीला उपविजेतेपद मिळाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल ससाणे, सुनिल रणपिसे, योगेश पवार, रमेश सकट, सुहास यादव यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.

आचार्य विद्यानिकेतनचा विजेता संघ पुढीलप्रमाणे- १) वुमेन्स पेअर- विशाखा दोरगे व रूणल रणपिसे २) मेन्स पेअर- यज्ञेश भोस्तेकर व नमन महावर ३) मिक्स पेअर- भूमिका भारंबे व आदित्य दिघे ४) वुमेन्स ग्रुप- श्रद्धा मोहिते, वैदही मयेकर व साक्षी गावडे ५) मेन्स ग्रुप- दिक्षांत ससाणे, समर्थ खन्नुकर, अथर्व जानसकर, नमो उनियाल.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content