Homeन्यूज ॲट अ ग्लांस'महादेवा'त सहभागी व्हा...

‘महादेवा’त सहभागी व्हा आणि मेस्सीबरोबर फुटबॉल खेळा!

‘महादेवा’त सहभागी व्हा आणि मेस्सीबरोबर फुटबॉल खेळा! हो.. १३ वर्षांखालील मुला-मुलींकरीता ही संधी आहे. महाराष्ट्र संस्था फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (वायफा) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यशासनाच्या क्रीडा विभागामार्फत, राज्यभरात महादेवा प्रकल्पांतर्गत एक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेचा उद्देश राज्यातील फुटबॉल खेळाचा विकास, प्रसार व लोकप्रियता वाढविणे हा आहे. ही योजना १३ वर्षांखालील मुलं व मुली यांच्यासाठी असून अर्जदारांची जन्मतारीख ०१ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१३दरम्यान असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर फुटबॉल निवडचाचण्या आयोजित केल्या जाणार आहेत. या निवडचाचण्यांच्या माध्यमातून राज्यातील ३० मुलं आणि ३० मुलींची अंतिम निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना येत्या १४ डिसेंबरला मुंबईत जागतिक ख्यातीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची अविस्मरणीय संधी मिळणार आहे.

मुंबई जिल्ह्यासाठीची निवडचाचणी नवल डी’सूझा फुटबॉल ग्राउंड, बांद्रा (मुंबई) येथे होणार असून,  केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या खेळाडूंनाच या निवडचाचणीसाठी माहिती व पुढील मार्गदर्शन मिळेल.

नोंदणीसाठी पुढील लिंक सक्रिय करण्यात आली आहे- https://forms.gle/6PAR766JoC9d2QH26

फुटबॉल खेळात उच्च कौशल्य असलेले आणि पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या खेळाडूंनीच नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क- सुधा राणे- 9322823035, मनीषा  गारगोटे (राज्य क्रीडा मार्गदर्शक)- 8208372034

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content