Homeचिट चॅटश्री उद्यानगणेश शालेय...

श्री उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेत ध्रुव भालेराव विजेता

मुंबईतल्या श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत अँटोनिओ डिसिल्व्हा हायस्कूल-दादरचा राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू ध्रुव भालेरावने विजेतेपद पटकाविले. मोक्याच्या क्षणी अचूक फटके साधत ध्रुव भालेरावने आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या नील म्हात्रेचे आव्हान १७-१ असे संपुष्टात आणले. आक्रमक खेळ करून अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या नील म्हात्रेला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

माघी श्री उद्यानगणेश जन्मोत्सवानिमित्त शिवाजी पार्क येथील श्री उद्यानगणेश मंदिर परिसरात झालेल्या मोफत शालेय कॅरम स्पर्धेत सीईएस मायकल हायस्कूल-कुर्ल्याचा निखिल भोसले व शेठ करमशी कानजी स्कूल-मुलुंडचा केवल कुळकर्णी उपांत्य उपविजेता; पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा पुष्कर गोळे, आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या वेदांत पाटणकर व सारा देवन, व्ही.एन. सुळे गुरुजी हायस्कूल-दादरची ग्रीष्मा धामणकर यांनी उपांत्यपूर्व उपविजेते तर हिरानंदानी फाउंडेशन स्कूल-ठाणेचा विश्वेत बिजोतकर, शारदाश्रम विद्यामंदिर-दादरचा सोहम जाधव, पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या केतकी मुंडल्ये व निधी सावंत, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल-दहिसरचा तीर्थ ठाकर, पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे, युनिव्हर्सल स्कूल-ठाणेचा शेवांश नाके यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपद स्ट्रायकरसह आकर्षक चषक मिळवून जिंकला.

समितीचे विश्वस्त मधुकर प्रभू, व्यवस्थापक संजय आईर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. संयोजकांतर्फे सहभागी खेळाडूंना मोफत टी शर्ट व अल्पोपहार देण्यात आला. प्रमुख पंचाचे कामकाज कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे, संतोष जाधव, ओमकार चव्हाण आदींनी पाहिले. समितीचे कार्यवाह डॉ. अरुण भुरे, विश्वस्त किरण पाटकर व अविनाश नाईक यांनी शालेय खेळाडूंचे विशेष कौतुक केले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content