नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...
नवी मुंबईतल्या खारघर येथील महाराष्ट्र भूषण देण्याच्या कार्यक्रमाची वेळ सर्वांच्या सोयीसाठी सकाळची ठरवण्यात आली होती. मात्र दोन दिवसात अचानक उष्मा वाढला आणि परिणामी उष्माघातामुळे...
मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा देताना या प्रकरणात आमचं सरकार असताना कोर्टात सुनावणी सुरू होती. पण आता ती केस बंद झाली आहे. कोर्टात याचिका दाखल करणाऱ्यांनी...
राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी...
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले. धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्येत बिघडली. त्यामुळे...
प्रखर देशभक्त, विज्ञानवादी समाजसुधारक, बुद्धिमान महाकवी, इतिहासकार, तत्त्वज्ञ आदी असंख्य पैलूंनी परिपूर्ण असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महामानवावर राजकीय स्वार्थातून चिखलफेक करणारे राहुल गांधी यांना...
कोणत्या औषधांचा तुटवडा आहे, याची माहिती गोळा होत नाही. सरकारचे प्रमुख मात्र गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कारण, मंत्र्यांमध्ये आपल्याला खरेदीचे अधिकार मिळावेत, यासाठी स्पर्धा लागलेली...
महाराष्ट्रातल्या गोरगरीब तरुण मुलींचे आयुष्य खराब करणाऱ्या लव्ह जिहाद तसेच धर्मांतराला बंदी घालणारा सक्षम कायदा महाराष्ट्र सरकारने तयार करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे...