Homeमुंबई स्पेशलबेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चाकेल्यानंतर सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बेस्ट भवनला जात लाड यांनी सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. बेस्ट कर्मचाऱ्यांचा १० नोव्हेंबरला होणारा पगारही ३ नोव्हेंबरलाच होणार आहे. त्यासोबतच त्यांना दिवाळीचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असे ते म्हणाले.

श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळत असल्याचा मनस्वी आनंद आहे. कामगारांच्या कष्टांचा सन्मान राखत, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दिवाळीत आनंदाचे क्षण आणण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असेही लाड यांनी सांगितले.

आशा स्वयंसेविकांनाही मिळणार पाच हजारांचे सानुग्रह अनुदान

दरम्यान, मुंबई महापालिके अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लेखी निर्देश दिले आहेत. यासंदर्भात पालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात महापौर तावडे म्हणतात की, मुंबई महापालिकेअंतर्गत सद्यस्थितीत एकूण १,४६१ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या स्वयंसेविका अत्यंत अल्प मानधनावर आरोग्यसेवा, लसीकरण मोहीम तसेच विविध शासकीय लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम अविरतपणे करत असतात. दीपावलीसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या सणाच्या काळातही सानुग्रह अनुदान देण्याबाबत या आशा स्वयंसेविकांचा विचार न होणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या सर्व आशा स्वयंसेविकांना दीपावलीनिमित्त प्रत्येकी ५,००० (पाच हजार) रुपयांचे सानुग्रह अनुदान तत्काळ मंजूर करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

समृद्ध स्वतंत्र भारत, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न

भारतीय संतपरंपरेने अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन, समता आणि मानवतेची मूल्ये जपली आहेत. या परंपरेला आधुनिक राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विसाव्या शतकातले एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्य मिळविणे हे राष्ट्रनिर्मितीचे अंतिम उद्दिष्ट नसून, स्वतंत्र भारताला समताधिष्ठित, स्वावलंबी, एकात्म आणि समृद्ध...

‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या गाण्यांचे लोकार्पण

मुंबईतल्या बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने नुकतेच ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले', या दोन मराठी गाण्यांचे लोकार्पण सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजिवासनसारख्या...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किंमत शून्य…

भीमाशंकर-कर्जत येथील टोरंट पॉवरच्या 3000 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कर्जत पोलीस ग्राउंडवरील सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात काय करायचे, काय नाही, हे सगळे दिल्लीतून ठरते,...
Skip to content