Homeपब्लिक फिगरतब्येत बरी नव्हती...

तब्येत बरी नव्हती आणि हे म्हणतात ‘नॉट रिचेबल…’!

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले. धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्येत बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो. मात्र माध्यमांनी ‘नॉट रिचेबल…’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाली. माध्यमांनी विनाकारण बदनामी करणे थांबवावे. खात्री करुनच यापुढे माध्यमांनी बातम्या द्याव्यात. माझ्याविषयी चुकीच्या बातम्या चालविल्यामुळे व्यथित झालो, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत यापुढे माध्यमांनी खात्री करुनच बातम्या दाखवण्याची सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केली.

काल रात्रीपासून काही माध्यमांवर अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार अज्ञात स्थळी रवाना झाल्याच्या तसेच ते सर्व नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या चालविल्या जात होत्या. याबद्दल अजितदादांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. काल शुक्रवारी, पुण्यात होतो. दुपारपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार माझा कार्यक्रम सुरू होता. मात्र गेले काही दिवस मी महाराष्ट्रभर दौऱ्यावर होतो. या दौऱ्याच्या काळात प्रचंड दगदग झाली. विश्रांती मिळाली नाही. झोपही पूर्ण होत नव्हती. त्याचा प्रतिकुल परिणाम माझ्या तब्येतीवर झाला, असे ते म्हणाले.

पित्त वाढले. त्यामुळे काल दुपारी अचानक अस्वस्थ वाटायला लागले. डॉक्टरांचा सल्ला घेत औषधे घेऊन पुण्यातल्या ‘जिजाई’ या निवासस्थानी विश्रांती घेतली. मात्र या काळात मी ‘नॉट रिचेबल…’ असल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या. कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची यालाही काही लिमीट असते. माध्यमात माझ्याविषयी आलेल्या बातम्या बघून मी व्यथित झालो, असे दादा म्हणाले.

आम्ही पब्लिक फिगर असल्याने आमच्याविषयी बातम्या करण्याचा माध्यमांना अधिकार आहे. मात्र कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या चालविणे योग्य नाही. यापुढे माध्यमांनी खात्री करुनच बातम्या चालवाव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content