स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
मुंबई अग्निशमन दलातील सहा अधिकारी - कर्मचारी यांना माननीय राष्ट्रपती महोदय यांचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक काल जाहीर करण्यात आली. त्यात उपप्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल...
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, कॅरम, बिलियर्डस ॲण्ड स्नूकर, यॉटिंग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडा प्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात...
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या, २३ जानेवारीला जयंती. यानिमित्त मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील ठाकरे यांचे स्मृतीस्थळ मुंबई महापालिकेच्या वतीने सुशोभित करण्यात आले...
अयोध्या येथील नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामाची नूतन बालमूर्ती स्थापित करून तिची प्राणप्रतिष्ठा सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ या शुभदिनी होत असल्याचा क्षण...
मराठी भाषा विभागामार्फत 14 ते 28 जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये लोकसहभाग असावा, यासाठी पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुंबईतल्या नागरिकांकडून सूचना...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी बंद करुन तेथे नवीन १२०० मि.मी. व्यासाची...
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, मंगळवारी १६ जानेवारी रोजी दावोस येथे शिष्टमंडळासमवेत उपस्थित राहणार असून या परिषदेतील...
मुंबईतल्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मनोहर फाळके कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या 25 विद्यार्थ्यांनी भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, राणीबाग येथे भेट दिली. यावेळी 160 वर्षांचा समृद्ध...