Homeचिट चॅटरौनक, तन्मय, दिनेश,अमृता...

रौनक, तन्मय, दिनेश,अमृता ठरले बेंचप्रेस स्पर्धेचे विजेते

पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन, रायगड यांच्यातर्फे व्ही. के. हायस्कूल, पनवेल येथे दीपक पाटकरच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या क्लासिक व इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत रौनक जितेकर, तन्मय पाटील, दिनेश पवार आणि अमृता भगतने आपापल्या गटांत सर्वोतम लिफ्टरचा मान मिळवला. समस्त पाटकर कुटुंबियांच्या सौजन्याने पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संदीप पाटील यांनी स्वतःसुद्धा बेंचप्रेसचे प्रात्यक्षिक केले. असोसिएशनचे कार्याध्यक्ष यशवंत मोकल, स्पर्धाप्रमुख सुभाष टेंबे आणि संदीप पाटकर यांच्या हस्ते संदीप पाटील यांना गौरविण्यात आले. बेंच प्रेस स्पर्धेमध्ये महाड, पेण, अलिबाग, कर्जत, खोपोली येथील खेळाडूंनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेत पंच म्हणून गोपीनाथ पवार, सुरेश धुळप, जितेंद्र यादव, राकेश पाटील, विक्रमसिंग अधिकारी, विशाल मुळ्ये, रामचंद्र गावडे, नितीन पगार यांनी जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी गतिमंद मुलांचे प्रशिक्षक राजेश अनगत (हनुमान व्यायामशाळा, पेण) यांना दीपक पाटकर यांच्या स्मरणार्थ गौरवचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सुनील झुंजारराव उपस्थित होते. नगरसेवक सुनील झुंजारराव यांच्या हस्ते पहिल्या राष्ट्रीय डेड लिफ्टमास्टर स्पर्धेत ब्राँझपदक मिळवणारे ज्येष्ठ खेळाडू माधव पंडित यांना खास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पॉवरलिफ्टिंग खेळाडू संजय रहाटे आणि मुंबई शहरचे माजी सचिव विनायक आचरेकरदेखील उपस्थित होते.

या स्पर्धेचे क्लासिक सांघिक विजेतेपद स्पार्टन्स फिटनेस (खोपोली) आणि उपविजेतेपद हनुमान व्यायामशाळा (पेण) यांनी प्राप्त केले. इक्विप्ड स्पर्धेचे ओव्हरऑल विजेतेपद आयएनडी क्लब (कर्जत) आणि उपविजेतेपद पॉवर हाऊस पॉवरलिफ्टिंग टीम (खोपोली) यांनी मिळवले. या विजेत्यांना दीपक पाटकर स्मरणार्थ चषक देण्यात आले.

या स्पर्धेचे किताब विजेते-

१) सब जूनियर स्ट्राँग बॉय क्लासिक स्पर्धा- रौनक जितेकर (चेतन फिटनेस)

२) क्लासिक सीनियर स्ट्राँगमॅन- तन्मय पाटील (वैयक्तिक, पेण)

३) क्लासिक मास्टर्स स्ट्राँग मॅन- दिनेश पवार (स्पार्टन फिटनेस, खोपोली)

४) ओव्हरऑल स्ट्राँग वुमन- अमृता भगत (पॉवर हाऊस टीम, खोपोली)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

विनय आपटेंच्या स्मृतीदिनानिमित्त लघुपट स्पर्धा

सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे ह्यांच्या १3व्या स्मृतीदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठान आणि मुंबईतल्या विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लघुपट (शॉर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शॉर्ट फिल्म पाठवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ आहे....

वसुबारस आणि भाऊबीज नाहीत दीपावलीचे भाग!

दीपावली हा प्रकाशाचा उत्सव! अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला...

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...
Skip to content