महाराष्ट्रातल्या रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत माटुंगा येथील गुरु नानक खालसा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १३ पदके पटकावली. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाने मुलांच्या गटात सलग सातव्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान संपादन केला.
पदकविजेत्या खेळाडूंना राजेश मुराव यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांचा या यशाबद्दल खालसा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रत्ना शर्मा आणि क्रीडा संचालिका जसबीर कौर मक्कर यांनी सर्व पदकविजेत्यांचे खास अभिनंदन केले आहे.
सुवर्णपदक विजेते-
१. दिवेश बांबणे, २. श्रीजय भगत, ३. शाहिद शेख, ४. आर्यन येवले, ५. निहाल भोईर, ६. प्रसाद पाटील, ७. श्रीनिधी काटकर.
रौप्यपदक विजेते- १. ओम कदम, २. विराज साळ.
कांस्यपदक विजेते- १. श्रीधर मलिक, २. असद वली, ३. अमर्त्य पोळ.

