Sunday, September 8, 2024
Homeमुंबई स्पेशलमुंबई अग्निशमन दलातील...

मुंबई अग्निशमन दलातील ६ जवानांना ‘गुणवत्‍तापूर्ण सेवा पदक’ जाहीर

मुंबई अग्निशमन दलातील सहा अधिकारी – कर्मचारी यांना माननीय राष्ट्रपती महोदय यांचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक काल जाहीर करण्‍यात आली. त्‍यात उपप्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल वसंत परब, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी (परिमंडळ ३) हरिश्‍चंद्र रघू शेट्टी, विभागीय अधिकारी देवेंद्र शिवाजी पाटील, दुय्यम अधिकारी राजाराम निवृत्‍ती कुदळे, प्रमुख अग्निशामक किशोर जयराम म्‍हात्रे, प्रमुख अग्निशामक मुरलीधर अनाजी आंधळे यांचा समावेश आहे.

“शौर्यम् आत्मसंयमनम् त्याग: ” हे ब्रीदवाक्य असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलातील ६ जवानांना माननीय राष्‍ट्रपती महोदय यांचे ‘गुणवत्‍तापूर्ण सेवा पदक’ जाहीर झाले आहे. त्याचा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणेः-

१) उप प्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल वसंत परब, हे ३० वर्षे ६ महिने मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. सद्यस्थितीत ते अग्निशमन दलातील प्रस्‍ताव विभाग व कार्यशाळेचा कार्यभार सांभाळत आहेत. त्‍यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविण्‍यात आले आहे.

२) उपप्रमुख अग्निशमन अधिकारी हरिश्‍चंद्र रघू शेट्टी हेदेखील मागील ३० वर्षे ६ महिने मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. नैसर्गिक आपत्‍तींसह मानवनिर्मित आपत्‍तीतदेखील त्‍यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सद्यस्थितीत मरोळ प्रादेशिक समादेश केंद्राचा कार्यभार सांभाळत आहेत. त्‍यांना यापूर्वी विविध संस्‍था – संघटनांकडून गौरविण्‍यात आले आहे.

अग्नी

३) विभागीय अधिकारी देवेंद्र शिवाजी पाटील हे गत ३२ वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. सद्यस्थितीत मुंबई अग्निशमन दलातील विभागीय अग्निशमन अधिकारी (प्रशासन) या पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना महानगरपालिका आयुक्‍तांच्‍या उत्‍कृष्‍ट अग्निशामक पारितोषिकाने यापूर्वी तीनवेळा गौरविण्‍यात आले आहे. महाराष्‍ट्र्र शासनानेदेखील त्‍यांना प्रशस्‍तीपत्रक देऊन गौरविले आहे.

४)  भायखळा येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले दुय्यम अधिकारी राजाराम निवृत्‍ती कुदळे हे ३१ वर्षे ४ महिने मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. त्‍यांना खाते अंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्‍यात आले आहे.

अग्नी

५) प्रमुख अग्निशामक (लिडिंग फायरमन) किशोर जयराम म्‍हात्रे हे सध्‍या दादर अग्निशमन केंद्रात कार्यरत आहेत. त्‍यांनी मुंबई अग्निशमन दलात ३२ वर्षे ९ महिने सेवा बजाविली आहे. त्‍यांनादेखील खाते अंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्‍यात आले आहे.


अग्नी

६) विक्रोळी येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले प्रमुख अग्निशामक (लिडिंग फायरमन) मुरलीधर अनाजी आंधळे हे २७ वर्षे ९ महिने मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. त्‍यांना खाते अंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्‍यात आले आहे.

Continue reading

श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या उत्सवाकरीता मुंबई महापालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम...

१७५३ शेतकऱ्यांना दिवसा होणार वीजपुरवठा उपलब्ध

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे नुकताच...

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत

श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्री गणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच...
error: Content is protected !!
Skip to content