बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये लोकसहभाग असावा, यासाठी पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुंबईतल्या नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई मेलवर २३ जानेवारी २०२४पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईच्या नागरिकांना असे कळविण्यात येते की, सन २०२४-२५ या वर्षाकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरू आहे. सदर अर्थसंकल्पीय अंदाज दि. ०५ फेब्रुवारी, २०२४ रोजी वा तत्पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने, लोकसहभागाच्या दृष्टीने बृहन्मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्यांना अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी कराव्यात.
तसेच ज्या नागरिकांना लेखी सूचना पाठवावयाच्या असतील; त्यांनी त्या दि. २३ जानेवारी २०२४पर्यंत सायंकाळी ४ वाजेपर्यंत पोहोचतील, अशा बेताने खालील पत्यावर पाठवाव्यात.
पत्ताः प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय, चौथा मजला, विस्तारीत इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महानगरपालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१