Saturday, June 22, 2024
Homeमुंबई स्पेशलमुंबईच्या 'राणी बागे'त...

मुंबईच्या ‘राणी बागे’त उद्यापासून उद्यानविद्या प्रदर्शन!

मुंबईत आले आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट दिली नाही, असा पर्यटक, अभ्यासक विरळाच. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वाधिक आकर्षण ठरते ते वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात (पूर्वाश्रमीच्या राणीच्या बागेत) दरवर्षी भरवले जाणारे उद्यानविद्या प्रदर्शन. यंदाचे प्रदर्शन उद्या शुक्रवार, दि. २ फेब्रुवारी ते रविवार, दि. ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे हे प्रदर्शन.

बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरणाद्वारे दरवर्षी आयोजित होणारे वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे हे २७वे वर्ष आहे. भायखळा (पूर्व) स्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आयोजित या भव्य प्रदर्शनाचे म्हणजेच ‘फ्लॉवर शो’चे (Flower-show) उद्या सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. शुक्रवारी दुपारी ११ ते रात्री ८ पर्यंत; तर दिनांक ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

दरवर्षीच्या वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनामध्ये पाना-फुलांचा वापर करून वैविध्यपूर्ण रचना सादर करण्यात येतात. या रचनांनादेखील मुंबईकर नागरिकांचा आणि विशेष करून लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. सन २०१५पासून या प्रदर्शनाला विविध सृजनशिल कल्पनांची जोड देण्यात आली आहे. त्यानुसार दरवर्षी एक वेगळा विषय घेऊन हे प्रदर्शन मांडण्यात येते. यंदाच्या प्रदर्शनाचा विषय ‘अॅनिमल किंग्डम’हा आहे. यात बागेच्या प्रवेशद्वाराजवळच झाडे, पाना-फुलांपासून हत्ती, वाघ आणि झेब्रा आदी प्राण्यांच्या पुष्प प्रतिकृती साकारल्या जाणार आहेत. याशिवाय प्रदर्शनात दहा हजार कुंड्या मांडण्यात येणार आहेत. त्यामध्ये विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे आणि भाजीपाल्याचा समावेश असेल. समवेत, खास आकर्षण म्हणून परदेशातील काही निवडक भाजीपालादेखील या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.

वास्तुविशारद विद्यार्थी घेणार धडे 

यंदाच्या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे उद्यान विभागामार्फत मुंबईतील विविध वास्तुविशारद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाचा अनुभव घेता यावा, यासाठी कालपासून आजपर्यंत दोन दिवसांत विशेष सत्रांचे आयोजन केले आहे. यामध्ये आय. ई. एस. महाविद्यालय, एल. एस. रहेजा महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, ज. जी. स्कूल ऑफ आर्टस् व रचना संसद महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जवळपास १५०-२०० विद्यार्थी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेत असल्याचेही परदेशी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना एखादे प्रदर्शन कसे मांडतात, त्यातील लॅण्डस्केपिंगचे डिझाईन कसे केले जाते, याचे प्रात्यक्षिक पाहायला आणि अभ्यासाला मिळत आहे.  

Continue reading

न्यूयॉर्कनंतर १०० किलोमीटर जलबोगदे असणारे शहर म्हणजे मुंबई

मुंबईतल्या अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' संयंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जल बोगदा प्रकल्पांतर्गत वडाळा ते परळदरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जलबोगद्याचा 'ब्रेक थ्रू' आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक...

देशातल्या 8 लोकसभा मतदारसंघांच्या काही मतांची होणार पडताळणी

भारत निवडणूक आयोगाने 1 जून 2024 रोजी जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीच्या अनुषंगाने, नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएमची बर्न्ट मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासणी/पडताळणीसाठी अनुक्रमे 8 आणि 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. याचा तपशील पुढीलप्रमाणे: लोकसभा आम चुनाव 2024ईवीएम जांच...

कायद्याच्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी

कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी...
error: Content is protected !!