मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनव्हासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना असेल तर.. एक रहस्यमय आणि रंगहीन घटना ‘रंगीत’ या चित्रपटात दडून बसली आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. ‘रंगीत’ येत्या शुक्रवारी, १७ मे रोजी 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आजवर न मिळालेल्या एका थरारक चित्रपटाचा मनमुराद आस्वाद घेता येणार आहे.
चित्रपटाची कथा एका फाईन आर्ट्स महाविद्यालयाच्या आवारात फिरते. विरहाच्या नैराश्येमुळे कायम नशेत असणारा सिद्धार्थ महाविद्यालयाच्या आवारात फिरत आहे. महाविद्यालयात नव्यानेच प्रवेश घेतलेल्याशिवाला आवारात एका स्त्रीच्या आत्म्याचा भास होत आहे. आत्म्याचा आणि सिद्धार्थच्या प्रेयसीचा चेहरा एकच असल्याचं लक्षात येतं. पण त्याला अचानक सोडून गेलेली प्रेयसी मरण पावली कशी, याचा शोध सुरू होतो. तिच्या मरणाचं कारण भयंकर असून त्यामागील रहस्यमय कथा प्रेक्षकांना चित्रपटात पाहयला मिळणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन प्रज्योत कडू यांनी केले असून मकरंद अनासपूरे, सयाजी शिंदे, भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहेरे या स्टार अभिनेत्यांनी चित्रपटात आपल्या अनोख्या भूमिका साकार केल्या आहेत.
मराठी मातीतल्या चित्रपटांमध्ये अनेकानेक प्रयोग व्हावेत असं नेहमी वाटतं. अशाच एका प्रयोगातून जन्मलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजनाच्या शिखरावर पोहोचवेल याची खात्री वाटते. त्यामुळेच आम्ही हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करत आहोत, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे ...
रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकाखाली मराठीमध्ये पाहयला मिळणार आहे. हा चित्रपट उद्या, १०...
नातेसंबंधांना जिच्यामुळे परिसस्पर्श लाभतो ती म्हणजे "आई". जगातलं सर्वोच्च आदराचं आणि परमपवित्र स्थान म्हणजे "आई". प्रेमाच्या अथांग सागरात लेकरांच्या अगणित चुका किंवा अक्षम्य अपराध...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गायन, वादन आणि नृत्य, यांच्या प्रगत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या कलाकार विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या अवलोकनासाठी दरवर्षी त्यांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. यावर्षीचा कार्यक्रम येत्या...
स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा. मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहोचवून तिची विद्रूपावस्था केली तर? या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेऊ लागला तर? अशीच एक भयाण...
अमेरिकेसह जगभर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केल्यानंतर हर्षद पराशरेंची पॅराशेअर एन्टरटेन्मेट्स, ही कंपनी आता तीन मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
धाराशिवच्या संत गोरोबाकाका सेवा समितीतर्फे बार्शी नाका येथील जिजाऊ चौकावरील स्वयंवर मंगल कार्यालयात श्री संत गोरोबाकाका संगीतमय चरित्रकथेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या...
कार्टूनिस्टस् कम्बाईन, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या पाच आणि...
प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुची वस्तू, दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयाची जोड, अनोखा विषय आणि त्याची साजेशी मांडणी अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाफ असणाऱ्या ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा आज अल्ट्रा झकास, या मराठी...