Sunday, September 8, 2024
Homeकल्चर +77व्या कान्स चित्रपट...

77व्या कान्स चित्रपट महोत्सवात पायल कपाडियाची बाजी

दोन परिचारिकांच्या जीवनाभोवती केंद्रित असलेल्या पायल कपाडियाच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाला ३० वर्षांत पहिल्यांदाच 77व्या कान्स चित्रपट महोत्सवातील सर्वोच्च पुरस्कार पाल्मे डी’ओरसाठी नामांकन मिळाले होते. यावेळी कपाडिया यांच्या चित्रपटाने ग्रँड प्रिक्स श्रेणीत दुसरे स्थान मिळवले. या विजयासह एफटीआयआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेची माजी विद्यार्थीनी पायल कपाडिया, या प्रतिष्ठित पुरस्काराला गवसणी घालणारी पहिली भारतीय ठरली आहे. शाजी एन करुण यांच्या ‘स्वाहम’ ने सर्वोच्च सन्मानाच्या स्पर्धेत धडक दिल्यानंतर 30 वर्षांनी भारताला  मजल मारता आली आहे.

77व्या कान्स चित्रपट महोत्सवात भारताची कामगिरी अभूतपूर्व ठरली आहे. दोन चित्रपट निर्माते, एक अभिनेत्री आणि एका सिनेमॅटोग्राफरने जगातील या आघाडीच्या चित्रपट महोत्सवात सर्वोच्च पुरस्कार पटकावले आहेत. भारतीय चित्रपट निर्मात्यांनी या वर्षीच्या कान्समध्ये वाखाणण्याजोगी प्रशंसा मिळवली आहे.

पायलच्या चित्रपटाला भारत आणि फ्रान्सदरम्यान स्वाक्षरीकृत झालेल्या दृकश्राव्य करारांतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अधिकृत इंडो-फ्रेंच सहनिर्मितीचा दर्जा दिला होता. मंत्रालयाने महाराष्ट्रात (रत्नागिरी आणि मुंबई) चित्रपटाच्या चित्रिकरणाला परवानगीही दिली होती. अधिकृत सहनिर्मितीसाठी भारत सरकारच्या प्रोत्साहन योजनेअंतर्गत सहनिर्मिती पात्रता खर्चाच्या 30% एवढी रक्कम या चित्रपटाला हंगामी मान्यतेद्वारे प्राप्त झाली होती.

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे विद्यार्थी चिदानंद एस नाईक यांनी कन्नड लोककथेवर आधारित “सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो” या 15 मिनिटांच्या लघुपटासाठी ला सिनेफ विभागात  प्रथम पारितोषिक पटकावले. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचा हा चित्रपट भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या दूरचित्रवाणी विभागाच्या एक वर्षाच्या अभ्यासक्रमात निर्मित केला जातो, ज्यात दिग्दर्शन, इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी या वेगवेगळ्या अभ्यासक्रमातील चार विद्यार्थ्यांनी वर्षाच्या शेवटी समन्वयित अभ्यासक्रम म्हणून एका प्रकल्पासाठी  एकत्र काम केले.

2022मध्ये FTIIमध्ये दाखल होण्यापूर्वी, चिदानंद एस नाईक यांची 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) 75 सर्जनशील नवचित्रकर्मीं (क्रिएटिव्ह माईंड्स)पैकी एक म्हणून निवड झाली होती. 75 क्रिएटिव्ह माईंड्स हा माहिती-प्रसारण मंत्रालयाचा, चित्रपट क्षेत्रातील नवोदीत तरुण कलाकार हुडकून त्यांना प्रोत्साहन देणारा एक उपक्रम आहे. भारतात जन्मलेल्या मानसी माहेश्वरीच्या बनीहूड या ॲनिमेटेड चित्रपटाला, ला सिनेफ निवड  विभागात तिसरे पारितोषिक मिळाले आहे, ही बाब इथे लक्षात घेणे महत्वपूर्ण ठरते.

या महोत्सवात जगप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. भारतात  प्रदर्शित झाल्याच्या 48 वर्षानंतर, नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया (NFDC-NFAI माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत) या भारताच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये जतन केलेला आणि फिल्म हेरिटेज फाउंडेशनने पुनर्संचयित केलेला बेनेगल यांचा मंथन चित्रपट कान महोत्सवात क्लासिक विभागात प्रदर्शित करण्यात आला.

भारतीय चित्रपटसृष्टीतील आपल्या जातिवंत कामासाठी परिचित असणारे प्रसिद्ध चलतचित्रणकार (सिनेमॅटोग्राफर) संतोष सिवन हे त्यांच्या “चित्रपट विषयक कारकीर्द आणि कामाच्या असामान्य दर्जेदार गुणवत्तेसाठी” 2024 कान्स चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित पियरे अँजेनीक्स ट्रिब्यूट पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले आशियाई चित्रकर्मी ठरले. ‘अनसर्टन रिगार्ड’ श्रेणीत, ‘द शेमलेस’मधील आपल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकत पहिली भारतीय ठरलेल्या अनसुया सेनगुप्ता,या आणखी एका चित्रकर्मीने ‌कान्समध्ये इतिहास घडवला.

एफटीआयआयचा माजी विद्यार्थी असलेला एक चित्रपट निर्माता मैसम अली हादेखील कान्समध्ये स्वतंत्रपणे चमकला. त्याचा “इन रिट्रीट” हा चित्रपट एसीआयडी कान्स साइडबार या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. 1993मध्ये स्थापन झाल्यापासून असोसिएशन फॉर द डिफ्यूजन ऑफ इंडिपेंडंट सिनेमा द्वारा संचालित विभागात पहिल्यांदाच भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

77व्या कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांसाठी हे एक ऐतिहासिक वर्ष ठरत असताना, पायल कपाडिया, संतोष सिवन, मैसम अली आणि चिदानंद एस नाईक यासारखे आपले माजी विद्यार्थी कान्समध्ये चमकल्यामुळे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेकडे आपले कर्तृत्व साजरे करण्याचे खास कारण आहे. एफटीआयआय ही भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे आणि केंद्र सरकारच्या आर्थिक पाठबळावर एक संस्था  (सोसायटी) म्हणून काम करते.

एक खिडकी मंजुरी ही एकाच ठिकाणी सर्व सुविधांची एकत्रित उपलब्धता, विविध देशांसोबत संयुक्त निर्मिती, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट या स्वायत्त संस्थांद्वारे चित्रपटक्षेत्रविषयक प्रशिक्षणाला पाठबळ, या माध्यमातून चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यास केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. यामुळे भारताला जगाचे प्रमुख चित्रपटविषयक आशय केंद्र (कंटेंट हब) म्हणून प्रस्थापित करण्याचे बहुआयामी प्रयत्न राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक परिणाम साधत आहेत.

Continue reading

श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या उत्सवाकरीता मुंबई महापालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम...

१७५३ शेतकऱ्यांना दिवसा होणार वीजपुरवठा उपलब्ध

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे नुकताच...

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत

श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्री गणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच...
error: Content is protected !!
Skip to content