मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शनिवारी, १५ जून २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता १६ ते ३० वर्षे वयोगटांसाठी हिन्दुस्थानी ख्याल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या सभागृहात ही स्पर्धा होईल.
सर्व स्पर्धक अव्यावसायिक हौशी कलाकारच असावेत. पहिले पारितोषिक १० हजार रुपयांचे आहे. प्रवेशअर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १३ जून २०२४ आहे. अर्ज संस्थेच्या कार्यालयात तसेच फेसबुक, ट्विटर आणि संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre.org या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ०२२-२४३०४१५०, ७७००९९४४९५ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.