मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २ जून रोजी सायंकाळी पाच वाजता पापरी चक्रवर्ती यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम भावे कुटुंबियांच्या सहकार्याने संस्थेच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी त्यांना तबल्यावर यती भागवत तर संवादिनीवर सुधांशू घारपुरे साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.