Homeचिट चॅटआत्माराम मोरे स्मृती...

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८ येथे होणार आहे.

जखमी क्रीडापटूंना रुग्णालयीन सेवा त्वरित उपलब्ध करण्यासाठी विविध हॉस्पिटलचे क्रिकेटपटू सहकार्य करीत असल्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी स्पर्धेचे सातत्य कायम राखले आहे. अजिंक्यपद पटकाविणाऱ्या संघाला रुपये पंधरा हजार पुरस्कारासह आकर्षक चषक व सर्व खेळाडूंना मेडल्सने सन्मानित केले जाणार आहे.

मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा यंदा बाद पद्धतीने आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीद्वारे आयोजित केली जाणार आहे. टॉप-१० संघांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक देण्यात येईल. सर्वोत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज तसेच प्रत्येक सामन्यातील दोन्ही संघातील प्रत्येकी एका उत्कृष्ट खेळाडूला आकर्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रुग्णालयीन सेवेत कायमस्वरूपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हॉस्पिटल संघातून स्पर्धेत खेळता येईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णालयीन क्रिकेट संघांनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा ब्रीच कँडी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे कप्तान प्रदीप क्षीरसागर (७९७७४ ७१९४३) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content