Homeन्यूज ॲट अ ग्लांसकार-बाईक मालकांसाठी खुशखबर;...

कार-बाईक मालकांसाठी खुशखबर; नव्या वाहनांसाठी ३ वर्षांची पीयूसी

कार आणि बाईकच्या मालकांना आता दरवर्षी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) घेण्याची झंझट संपणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १३ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिसूचित केलेले केंद्रीय मोटार वाहन (१६वे संशोधन) नियम, २०२६ आता राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने लागू झाले आहेत. या नव्या नियमांनुसार, वाहनाचे उत्सर्जन मानक, वय आणि ते खाजगी आहे की व्यावसायिक, यानुसार पीयूसीची वैधता ठरवण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात मोठा दिलासा ६ वर्षांपेक्षा कमी जुन्या बीएस-६ मानकांच्या खाजगी वाहनांना मिळाला आहे. त्यांचे पीयूसी प्रमाणपत्र आता तब्बल ३ वर्षांसाठी वैध राहणार आहे. एप्रिल २०२०पासून देशात बीएस-६ मानक लागू असल्याने लाखो वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.

मात्र, ही ३ वर्षांची सूट सर्वांना नाही. ६ ते १० वर्षे जुन्या बीएस-६ खाजगी वाहनांना दरवर्षी, तर १० वर्षांपेक्षा जास्त जुन्या बीएस-६ खाजगी वाहनांना दर ६ महिन्यांनी पीयूसी काढावे लागणार आहे. बीएस-६ व्यावसायिक वाहनांसाठी ६ वर्षांपर्यंत २ वर्षे, ६ ते १० वर्षांसाठी १ वर्ष आणि १० वर्षांवरील वाहनांसाठी ६ महिने अशी वैधता ठेवण्यात आली आहे. तर बीएस-४ वाहनांना आता दर ६ महिन्यांनी आणि बीएस-१, बीएस-२, बीएस-३ वाहनांना दर ३ महिन्यांनी पीयूसी काढावे लागणार आहे. म्हणजेच जुन्या वाहनांवर नियम अधिक कडक झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, आधीपासून असलेल्या पीयूसीवर नवी वैधता आपोआप लागू होणार नाही. नियम लागू झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा पीयूसी रिन्युअल कराल, तेव्हाच नवी वैधता मिळेल. तसेच, सर्टिफिकेट संपण्याच्या १० दिवस आधी रिन्युअल केल्यास नवे सर्टिफिकेट जुन्या संपण्याच्या तारखेपासूनच लागू मानले जाईल. पीयूसीशिवाय वाहन चालवल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत मोठा दंड होऊ शकतो. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भरत सावंतने जिंकली नलावडे स्मृती शालेय कॅरम स्पर्धा

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शशिकलाताई फौंडेशन व अविनाश नलावडे स्पोर्ट्सतर्फे बालदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली‌ कॅरमप्रेमी प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय कॅरम स्पर्धा आरपीडी हायस्कूल-सावंतवाडीच्या भरत सावंतने जिंकली. निर्णायक बोर्डाच्या अगोदर ११-७ अशी आघाडी घेणाऱ्या द्वितीय मानांकित प्रसन्न गोळेला भरत...

१९७७ ते २००८… ३१ वर्षांच्या आठवणी तराळल्या एकाच छताखाली!

दिवाळी म्हटली की दिव्यांची आरास आणि फराळाचा सुगंध, पण यंदाची दिवाळी वसंत सहकारी साखर कारखाना, वनकोठे - वसाकाच्या (जळगाव जिल्हा, एरंडोल तालुका) परिवारासाठी वेगळीच ठरली. ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सन १९७७ ते २००८ या कालावधीतील जवळपास १५० मित्र...

मुंबईत येत्या २० नोव्हेंबरपासून ३ दिवस रसिकांसाठी संगीताची मेजवानी

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा, सुरांची माधुरी आणि स्वरकलेचा अभिजात वारसा जपणाऱ्या मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने यंदाही वार्षिक संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २२ नोव्हेंबर, या कालावधीत रंगणारा हा त्रिदिवसीय संगीत महोत्सव...
Skip to content