Homeन्यूज ॲट अ ग्लांसबेंगळुरूचा पत्ता कट!...

बेंगळुरूचा पत्ता कट! आयपीएल फायनल आता अहमदाबादमध्ये!!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६च्या अंतिम सामन्याच्या यजमानपदाबाबत मोठी उलथापालथ झाली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)चे होमग्राऊंड असलेल्या बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद हिसकावून घेण्यात आले आहे. आता आयपीएल २०२६चा अंतिम सोहळा ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. बीसीसीआयने बुधवारी या निर्णयावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले.

बेंगळुरूकडून फायनलची संधी जाण्यामागे प्रामुख्याने कर्नाटकच्या आमदारांचा ‘तिकीट वाद’ कारणीभूत ठरल्याचे समोर येत आहे. कर्नाटकच्या काही आमदारांनी, विशेषतः काँग्रेस आमदार विजयानंद कशप्पनवार यांनी, प्रत्येक आमदाराला किमान ५ व्हीआयपी तिकिटे देण्याची मागणी केली होती. “आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला रांगेत उभे करू नका,” अशी भूमिका त्यांनी घेतली होती. कर्नाटक विधानसभेतही या मुद्द्यावरून गदारोळ झाला होता. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनवर या आमदारांकडून प्रचंड दबाव टाकला जात होता. क्रिकेटच्या सामन्यात राजकीय हस्तक्षेप आणि तिकिटांच्या वाटपावरून सुरू असलेला हा गोंधळ पाहता, बीसीसीआयने सुरक्षेच्या आणि नियोजनाच्या कारणास्तव फायनलचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला.

सुरक्षेचा प्रश्न आणि जुन्या आठवणी

गेल्या वर्षी ४ जूनला आरसीबीच्या विजयानंतर काढलेल्या ‘ट्रॉफी परेड’दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे स्टेडियमच्या सुरक्षाव्यवस्थेवर आधीच प्रश्नचिन्ह होते. या पार्श्वभूमीवर, मोठ्या गर्दीच्या फायनल सामन्यासाठी बीसीसीआयने कोणताही धोका पत्करण्यास नकार दिला. परिणामी अंतीम सामन्याचे स्थळच बदलले गेल्याचे समजते.

आयपीएल २०२६ नॉकआउट सामन्यांचे नवे वेळापत्रक

सामना | तारीख | मैदान / शहर

  • क्वॉलिफायर १ | २६ मे | एचपीसीए स्टेडियम, धरमशाला
  • एलमिनेटर | २७ मे | मुल्लानपूर, नवी चंदीगड

| क्वॉलिफायर २ | २९ मे | मुल्लानपूर, नवी चंदीगड

  • ग्रँड फायनल | ३१ मे | नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

बेंगळुरू पूर्णपणे ‘आउट’

विशेष म्हणजे, केवळ फायनलच नव्हे तर एकही बाद फेरीचा (प्ले ऑफ) सामना बेंगळुरूला मिळालेला नाही. धरमशाला आणि चंदीगडसारख्या नवीन केंद्रांना नॉकआउट सामन्यांची संधी देण्यात आली आहे. आरसीबीने गेल्या वर्षी विजेतेपद पटकावल्यामुळे परंपरेनुसार फायनल बेंगळुरूमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, राजकीय आणि तांत्रिक कारणांमुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

बीसीसीआयचे मत

“हवामान आणि इतर तांत्रिक बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे बीसीसीआयकडून अधिकृतपणे सांगण्यात आले असले तरी, पडद्यामागील तिकीट वादच याला कारणीभूत असल्याचे क्रीडा वर्तुळात बोलले जात आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content