Homeमुंबई स्पेशलउद्या घराबाहेर पडा...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C सारखं जाणवेल. उत्तर-पश्चिम दिशेने आर्द्रता 78% ते 84% पर्यंत राहिल. हवेत दमटपणा जास्त राहील. त्यामुळे दुपारी बाहेर जाताना काळजी घ्या. छत्री आणि रेनकोट सोबत ठेवा. दमटपणा जास्त असल्याने पाणी पित राहा, असे आवाहन संबंधितांनी केले आहे.

छत्री

गेल्‍या २४ तासांत कुलाबा येथे २४८ मिलीमीटर तर सांताक्रूज येथे २२५ मिलीमीटर, मालवणी येथे ३४० तर परळ भागात ३३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई शहर आणि उपनगरांमधील अनेक भागात गेल्या काही तासांत ३०० मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून ७ हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणी तैनात आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली असली तरी पालिकेने स्थापित केलेले उदंचन पंप, पर्जन्यजल उपसा केंद्रे तसेच पूरनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा होत असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सखल भाग, रेल्वेस्थानके, महत्त्वाचे रस्ते, पूल तसेच किनारी भागांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. संबंधित विभागांचे अभियंते, कर्मचारी आणि नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असून नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.

मुंबईत मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज पहाटे ४.३० वाजता पालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन भिडे यांनी केले आहे. नालेस्वच्छता, पर्जन्यजलवाहिन्या आणि जलनिचरा व्यवस्थेची नियमित पाहणी सुरू असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री घटनास्थळी पाठविण्यात येत आहे. झाडे पडणे, शॉर्टसर्किट, जलभराव किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि इतर संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content