Homeपब्लिक फिगरप्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटीकल सायन्समधून एम. एसस्सी (अर्बन स्टडीज) ही पदवी प्राप्त केली आहे. त्या भारतीय प्रशासकीय सेवेतील सन २००१ तुकडीच्या सनदी अधिकारी आहेत.

त्यांनी त्यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात अहिल्यानगर (तत्कालिन अहमदनगर) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केली. त्यानंतर, धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहिले. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि सहआयुक्त (चौकशी), सचिव (मराठी भाषा विभाग) या पदांवर काम केले. नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त पदावरही त्यांनी काम केले आहे. विशेष म्हणजे, नागपूर विभागाच्या त्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त होत्या. दरम्यान, त्या केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीने वस्त्रोद्योग मंत्रालयात सहसचिव आणि अणूऊर्जा विभागात सहसचिव तथा अतिरिक्त सचिव या पदावर कार्यरत होत्या.

प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विस्थापित झालेल्या १० गावांच्या जमीन संपादन व पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रभावित नागरिकांचे पुनर्वसन करत आणि समाजाचा विश्वास कायम राखत हा प्रकल्प यशस्वीपणे पुढे नेला. सन २०२५मध्ये सिंगापूरमध्ये पार पडलेल्या आयटीएमए सस्टेनिबिलिटी फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना वस्त्रोद्योगातील हरित परिवर्तन आणि चक्रीय अर्थव्यवस्थेबाबत भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली. ‘कस्तुरी कॉटन’, या उपक्रमाच्या प्रारंभात महत्त्वपूर्ण योगदान देत स्वदेशी आणि उच्च दर्जाच्या कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रोत्साहन दिले. वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत असताना त्यांनी माहिती आदान-प्रदान प्रणाली विकसित करून विविध क्षेत्रांतील मोठ्या प्रमाणावरील करचुकवेगिरी उघडकीस आणण्यास मदत केली. मराठी भाषा विभागाच्या सचिवपदाच्या कार्यकाळात मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार आणि लोकप्रियता वाढविण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय उपक्रमांची सुरुवात केली. अहिल्यानगर येथे महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे नेतृत्त्व करून महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीला त्यांनी चालना दिली.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content