Homeमुंबई स्पेशलमुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन ‘एसी चेअर कार’ (एसी-सीसी) आणि एका ‘एक्झिक्युटिव्ह क्लास कोच’ (ईसीसी) डब्याचा समावेश आहे. यामुळे भारतातल्या सर्वात गर्दीच्या आणि सर्वाधिक मागणी असलेल्या आंतर-शहरी रेल्वे मार्गांपैकी एक असलेल्या या गाडीच्या  प्रवाशांकरीता आसनांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ गाडी सेवा सुरू झाल्‍यापासून तिला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या गाडीला बोगी वाढविण्‍याचा हा निर्णय घेतला आहे. प्रवासाच्या गर्दीच्या काळात वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी केलेली जी तात्पुरती वाढ होती, तिला आता कायमस्वरूप स्वरूप देण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद हा 491 किलोमीटरचा मार्ग आहे. वंदे भारत गाडी हा प्रवास 5 तास 30 मिनिटांत पूर्ण करते. वंदे भारत रेल गाडी बोरीवली, वापी, सूरत आणि वडोदरा येथे थांबते. हा मार्ग पश्चिम भारतातला मुंबई आणि अहमदाबाद या आर्थिकदृष्ट्या प्रमुख दोन शहरांना ही वेगवान रेल्वे जोडली गेली आहे.

मुंबई सेंट्रल-अहमदाबाद सेवेव्यतिरिक्त, गाडी क्रमांक 20901/20902 गांधीनगर राजधानी ते मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस धावते. ही रेल्वेगाडीही गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यातील आणखी एक महत्त्वाचा वेगवान दुवा आहे. गांधीनगरला मुंबईशी जोडणारा हा मार्ग, अहमदाबाद-गांधीनगरच्या विस्तृत क्षेत्रालाही सेवा पुरवतो. यामुळे व्यावसायिक, प्रशासकीय आणि दैनंदिन प्रवाशांना अधिक वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो., तसेच या दोन राज्यांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ होतात.

देशभरामध्‍ये आतापर्यंत, 162 वंदे भारत सेवा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content