Homeन्यूज अँड व्ह्यूजसनीला आता आजूबाजूला...

सनीला आता आजूबाजूला सत्यनारायणही नको! हळदीचेही वावडे!!

निर्जन स्थळी गोळ्या घालणे तसं सोपं असतं. गर्दीच्या ठिकाणी सावजाचा अचूक वेध घेणं तस कठीणच असतं. पण ‘सामान’ चांगलं असेल तर लांबूनही वेध घेता येतो. धावपळीत म्हणजे बाईक वा स्कूटरवरून दोनतीन दिशेने यायचे व एकाने काम करायचे आणि वन टू व्हायचे अशी गुन्हेगारी जगताची अलिखित नियमावली असते. दोनतीन दिशांना पांगणे म्हणजे पोलिसांचे काम वाढवणे असते. गुन्हेगारी जगतात त्याला ‘चकमा’ देणं म्हणतात. कुठलाही गुन्हेगार गर्दीला घाबरत नाही. उलट गुन्हेगार अशा गर्दीची ‘दर्दी’ असते. पण, अगदी याऊलट एक माहिती हाती आली आहे. चुनाभट्टीतील एका भाईला गर्दीची ऍलर्जी झालीय… चुनाभट्टीत पप्पू एरवणकर याची भररस्त्यात हत्त्या करणारा प्रमुख संशयित सनी पाटील वैद्यकीय करणास्तव जामीनावर बाहेर आला आहे. हे सनी पाटील नामक महाशय चुनाभट्टीतील पाटील चाळीत राहतात अशी माहिती आहे. आता या सनीला आजूबाजूला केलेली वा झालेली सत्यनारायणाची पूजाही चालत नाही. हळदी समारंभ नको, लग्नाची वरात नको. थोडक्यात गर्दी जमेल असा कुठलाच समारंभ नको.

वा रे वा! खरंतर असे उघड सांगायची त्याची हिम्मत नाही. पण आपल्या पंटर्सतर्फे त्याने हा मेसेज तमाम चुनाभट्टीत फिरवलेला असल्याचे खात्रीशीररित्या समजले आहे. वैद्यकीय कारण? मग घरीच कसा? वैद्यकीय कारणास्तव रजा मिळाली असेल तर हरकत घेण्याचे कारणच नाही. पण कुठल्या वैद्यकीय तपासण्यांसाठी त्याला रजा मिळाली आहे व त्या चाचण्या कुठल्या रुग्णालयात करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, हे पोलिसांनी जाहीर करणे गरजेचे आहे. शिवाय जामीन काळात पोलीसठाण्यात हजेरीही लावावी लागते असा नियम आहे, म्हणे. या

सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी चुनाभट्टी पोलीसठाणे करत असेल असे आपण समजूया. कारण वैद्यकीय कारणास्तव तुरुंगाबाहेर आलेला हा सनी, एरवणकर हत्त्येतील प्रमुख संशयित आहे. याप्रकरणी एका माजी लोकप्रतिनिधीकडे संशयाची सुई जात होती. परंतु त्याला त्याच्या ‘देवपित्या’ने अभय दिल्याने तो बाहेरच होता. तो राहत्या इमारतीखाली कधीच उतरला नाही असे रहिवासी सांगतात.

हत्त्येचा कट रचणारा बिल्डरही चमत्कार घडावा त्याप्रमाणे पोलीसठाण्याची हवा खाऊन बाहेर आला. आता या बिल्डरने आपल्या भागीदारालापुढे करून चुनाभट्टी परिसरातील अन्य पुनर्वसनाची कामे घेतल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत पप्पू एरवणकरची पत्नी नगरसेविका म्हणून निवडून आली आहे. एरवणकर कुटूंबही चुनाभट्टीत जवळजवळ त्याच परिसरात राहते जेथे सनीचा मुक्काम आहे. साहजिकच दुष्मनीचा खुन्नस दोन्ही बाजूंकडून निघू शकतो. म्हणूनच संशयित आरोपीला तेथून हलवून रुग्णालयात दाखल करावे अशी मागणी तेथील नागरिकांची आहे.

छायाचित्र मांडणी- सोनाली

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेगारीविषयीचे अभ्यासक आहेत.)

Continue reading

हेतूपुरस्सर धूळ खात पडलेल्या मिडी बसेस आणा आधी मुंबईच्या रस्त्यांवर!

मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नुकताच 'लोकसवांद'मध्ये प्रथमच विस्तृत संवाद साधत पालिका प्रशासनासमोरील काही आव्हाने व भविष्यातील मोठ्या प्रकल्पांबाबत चर्चा केली. एखाद्या मोठ्या महानगरीचे व्यवस्थापन करणे तसे जिकरीचेच आणि आव्हानत्मक असते यात शंकाच नाही....

टेकाड्यावर झोपडपट्ट्या उभारणारे भूमाफिया मोकाटच!

"ऐशा झोपडपट्ट्या माजवाव्या गहिवर काढोनी गाजवाव्या निवडणूक येता खाजवाव्या, धूर्त हस्ते सर्व पक्षांसी वाटे हवी, कैसी वर्णील दुबळा कवी, पामर वाचा" (मंगेश पाडगावकर) कविवर्यांची ही सुमारे 30 वर्षांपूर्वीची कविता आठवण्याचं कारण ठरली मुंबईतल्या घाटकोपरच्या नारायण नगरातील दरड कोसळून झालेली भीषण दुर्घटना! कवितेत झोपड्यांऐवजी दरडी...

भाईंदरमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात ताकाचा ग्लास आणि …

वाचक हो, तुम्हाला आठवत असेलच की जुन्या हिंदी चित्रपटात अर्ध्या नोटेचं चिटोरं दाखवलं की खलनायकाच्या गुहेत विनासायास प्रवेश मिळत असे. (हल्ली काही वेबसिरीजमध्येही हा खेळ दाखवत असतात) तसेच लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातर्फे धाड पडली की काहीजण नोटा खातात. काहीजण संडासाच्या...
Skip to content