Homeटॉप स्टोरीप्रसिद्ध अभिनेते नाना...

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. ते डोना पावला येथील आपल्या घरी होते. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना लगेचच जवळच्या मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याकरीता साधारण ३५ मिनिटे सीपीआर, हा तातडीचा उपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाटेकर यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पाटेकर यांना मृत घोषित करण्यात आले.

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रातल्या मुरुड-जंजिरा येथे झाला. मुंबईतल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून कलाक्षेत्राचे शिक्षण पूर्ण केले. अत्यंत गरिबी आणि संघर्षातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी चित्रपटांची पोस्टर्स रंगवण्याचे कामही केले. नाना पाटेकर आपल्या दमदार अभिनय, कडक संवादफेक (डायलॉग डिलिव्हरी) आणि वास्तववादी भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. १९७८मध्ये ‘गमन’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘अंकुश’, ‘परिंदा’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’, ‘राजनीती’ इत्यादी चित्रपटांतला त्यांचा अभिनय लक्षात राहण्यासारखा आहे. ‘नटसम्राट’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘देऊळ’, ‘आपला माणूस’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘पक पक पकाक’ इत्यादी मराठी चित्रपटांतूनही पाटेकर यांनी आपल्या भूमिका साकारल्या होत्या.

त्यांनी १९९१मध्ये ‘प्रहार: द फायनल अटॅक’ या लष्करावर आधारित गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. २०१३ साली त्यांना भारतीय चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘परिंदा’ (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता), ‘क्रांतिवीर’ (सर्वोत्कृष्ट अभिनेता), ‘अग्निसाक्षी’ (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता) या चित्रपटांसाठी नाना पाटेकर यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला. ‘अंकुश’, ‘अंगार’, ‘क्रांतिवीर’, ‘अपहरण’ इत्यादी चित्रपटांतील अभिनयासाठी विविध श्रेणींमध्ये त्यांना प्रतिष्ठेचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.

नाना पाटेकर हे केवळ अभिनेतेच नव्हते तर ते एक संवेदनशील समाजसेवकदेखील होते. २०१५मध्ये त्यांनी ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून ‘नाम फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांतील आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत, पाणी अडवा-पाणी जिरवा उपक्रम व पुनर्वसनाचे कार्य केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content