Homeन्यूज ॲट अ ग्लांसराष्ट्रीय आरोग्य अभियानातील...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, अस्थिरोगतज्ज्ञ, कान-नाक-घसा शल्यचिकित्सक आणि फिजिशियन यांना नॉन-टीएसपी क्षेत्रात एक लाख रुपये, तर टीएसपी क्षेत्रात एक लाख १५ हजार रुपये निश्चित मासिक मानधन मिळेल. त्यामुळे या तज्ज्ञांचे एकूण मासिक मानधन कमाल तीन लाख ५० हजार रुपयांपर्यंत राहील.

पूर्णवेळ हृदयरोगतज्ज्ञांसाठी नॉन-टीएसपी क्षेत्रात दोन लाख ५० हजार रुपये आणि टीएसपी क्षेत्रात दोन लाख ७५ हजार रुपये निश्चित मासिक मानधन राहील. कामगिरीआधारित रकमेसह त्यांना अनुक्रमे कमाल चार लाख ५० हजार आणि चार लाख ७५ हजार रुपये मासिक मानधन मिळू शकेल. पूर्णवेळ विकृतीशास्त्रज्ञांना नॉन-टीएसपी क्षेत्रात ८० हजार आणि टीएसपी क्षेत्रात एक लाख रुपये, अर्धवेळ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांना अनुक्रमे ४० हजार व ५० हजार रुपये, तर पूर्णवेळ मूत्रपिंडविकारतज्ज्ञांना दोन्ही क्षेत्रांत एक लाख २५ हजार रुपये मानधन निश्चित केले आहे. अभियानाच्या विविध योजनांतील प्रथम संदर्भ सेवा केंद्रे आणि इतर रुग्णालयांमध्ये नव्याने नियुक्त किंवा पुनर्नियुक्त होणाऱ्या तज्ज्ञांना १ ऑक्टोबर २०२६पासून सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार मानधन द्यावे, असे निर्देश आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक संजय काटकर यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.

मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्त्रीरोग, बालरोग, भूलशास्त्र, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, कान-नाक-घसा, औषधवैद्यक, नेत्ररोग, मानसोपचार, क्ष-किरणशास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, मूत्रपिंडविकार आणि हृदयरोग अशा १४ विशेषज्ञ सेवांचा समावेश आहे. भेटीवर किंवा गरजेनुसार बोलावण्यात येणाऱ्या तज्ज्ञांसाठी बाह्यरुग्ण तपासणी, शस्त्रक्रिया, वैद्यकीय प्रक्रिया, आपत्कालीन सेवा आणि आंतररुग्ण उपचारानुसार स्वतंत्र मानधन दर निश्चित केले आहेत. बहुतेक प्रमुख शस्त्रक्रिया अथवा प्रक्रियांसाठी नॉन-टीएसपी क्षेत्रात प्रतिप्रकरण पाच हजार आणि टीएसपी क्षेत्रात सात हजार रुपये देण्याची तरतूद आहे. निश्चित मासिक मानधनासाठी तज्ज्ञांनी संबंधित विशेषज्ञतेनुसार बाह्यरुग्ण तपासणी, आंतररुग्ण सेवा, शस्त्रक्रिया किंवा प्रक्रियाअभियानाने कालीन कॉलचे किमान कामगिरी निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. निकष पूर्ण करणाऱ्या तज्ज्ञांना निश्चित तसेच कामगिरीआधारित मानधन मिळेल. निकष पूर्ण न झाल्यास संबंधित तज्ज्ञाला केवळ प्रत्यक्ष कामगिरीवर आधारित मानधन मिळेल. नियमित तज्ज्ञांनीही हे किमान कामगिरी निकष पूर्ण करणे अपेक्षित आहे. संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक तज्ज्ञांच्या कामगिरीचे संनियंत्रण करतील. आयपीएचएसअंतर्गत तज्ज्ञांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीवर नोंदविण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...

लहान मुलगा व गाईच्या नात्याची झलक पाहा ‘धाराऊ’मध्ये!

बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस प्रस्तुत, मनिष सुरेश शिंदे दिग्दर्शित ‘धाराऊ’चा अधिकृत पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून या पोस्टरने या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी, मातीशी जोडलेली नाती आणि गोमातेबद्दलची श्रद्धा यांची भावस्पर्शी मांडणी करणाऱ्या ‘धाराऊ’ या मराठी...
Skip to content