Homeमुंबई स्पेशल'काळा घोडा' महोत्सवात...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ व विविध उपयोगी साहित्याला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना राबवित असते. पालिकेच्या नियोजन विभागाकडून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. याअंतर्गत महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून बचत गट सदस्यांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी पालिका हा उपक्रम राबविते. या उपक्रमामुळे महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्नाबरोबरच त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग, नव्या ग्राहकांशी थेट संवाद आणि बाजारपेठेचा अनुभव मिळाला. एकूण १८ बचत गटांनी सहभाग नोंदवून आर्थिक स्वावलंबनाचे ठोस उदाहरण निर्माण केले. यावर्षीच्या काळा घोडा महोत्सवाचे वेगळेपण म्हणजे प्रथमच तृतीयपंथी बचत गटाने या महोत्सवात सहभाग घेतला, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content