Homeडेली पल्सशिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ....

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे यांच्या अध्यक्षतेखाली एक हृद्य सोहळा संपन्न झाला. त्यात प्राचार्य कामटे यांना निरोप देण्यात आला.

सुविद्या प्रसारक संघाच्या याच महाविद्यालयातील पूर्वीच्या प्राचार्या सुहासिनी कुळकर्णी यांच्या पावलावर पाऊल ठेवून कामटे यांनी शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावली. पीएचडी मिळवली. शिक्षिका, उपप्राचार्या, प्राचार्या अशी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असताना तीन विविध संस्थांचेआदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मता प्रतिभा रत्न पुरस्कार डॉ. कामटे यांनी मिळविले. शाळेच्या प्रशस्त सभागृहात सेवापूर्ती शुभेच्छा सोहळा पार पडला. यावेळी महादेव रानडे, सुविद्या प्रसारक संघाच्या कार्याध्यक्षा देवयानी सबनीस, सहकार्यवाह वर्षा कुलकर्णी, सदस्य विजय वडतकर यांच्या हस्ते डॉ. कामटे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

कृतज्ञता सोहळ्यात बोलताना डॉ. सुनिता कामटे या अत्यंत भावूक झाल्या आणि तेहतीस वर्षांचे प्रसंग सांगताना विशेषकरून सुहासिनी कुलकर्णी यांच्याबरोबरच्या सहवासातील दिवस आठवताना त्यांचे डोळे पाणावले होते. क्षणभर त्या थांबल्या आणि मग आपले विचार पूर्ण केले. फडतरे, संजय पाटील, सचिन गवळी, प्राची वालकर, वृंदा ठाकर, संजय सर्जे, ज्योती पिंपळे, आदींनी डॉ. कामटे यांच्या गौरवपूर्ण कारकीर्दीबद्दल त्यांचा गुणगौरव केला. रामचंद्र गिरी यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश चौधरी यांनी ध्वनीचित्रफित तयार केली होती. अतुल काटे यांनी आभारप्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content