Homeन्यूज ॲट अ ग्लांसइराणकडून बाब-अल-मंदबची केली...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण हा युद्धविराम अनिश्चित काळाकरीता वाढवत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणच्या सरकारमध्ये कमालीचा संघर्ष चालू असून लवकरच इराण चर्चेला बसेल, असे अमेरिकेने म्हटले आहे. इराणने मात्र या युद्धविराम लांबवण्याच्या निर्णयाला फारसे महत्त्व दिलेले नाही. होर्मूझ सामुद्रधुनीभोवती केलेली नाकेबंदी जोपर्यंत अमेरिका हटवत नाही तोपर्यंत आम्ही अमेरिकेबरोबर कोणतीही चर्चा करणार नाही आणि हरलेला पक्ष (अमेरिका) आमच्यासमोर अटी ठेवू शकत नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. दरम्यान, अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीला प्रत्त्युत्तर देण्यासाठी इराणकडून लाल सागरातून जाणारी बाब-अल-मंदब सामुद्रीधुनी बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी इराणकडून हूती बंडखोरांची मदत घेतली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

इराण

होर्मूझवरची नाकेबंदी हा युद्धविरामाचा भंगच आहे आणि आमच्या व्यापारी जहाजांवर हल्ले करून त्यांना ताब्यात घेणे, त्यावरील खलाशांना ओलीस ठेवणे हा समुद्री डाका आहे, असे म्हणत इराणने या जहाजांना सोडून देण्याची मागणी केली आहे. समुद्रातली ही चाचेगिरी आम्ही सहन करणार नाही. अधिक ताकदीने आम्ही ती मोडून काढू, असा इशारा इराणने दिला आहे. अमेरिकेकडून एकतर्फी वाढवण्यात आलेला युद्धविराम हल्ल्यासाठी चाललेल्या तयारीसाठी आहे किंवा चर्चेची फेरी हा कटाचा एक भाग असल्याचा संशयही इराणकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांच्या युद्धविराम वाढवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. नाटोमधल्या युरोपीय देशांनीही या निर्णयाचे स्वागत केले असले तरी होर्मूझ सामुद्रधुनी सर्वांकरीता खुली राहवी म्हणून काय करायचे यावर ३० युरोपीय देश चर्चा करणार आहेत. ब्रिटन तसेच फ्रान्सने यासाठी पुढाकार घेतला आहे.

इराण

रशियाचा युक्रेनवर जोरदार हल्ला

अमेरिका मध्यपूर्व आशियातल्या इराणवरच्या लष्करी कारवाईत गुंतल्याचा फायदा घेत काल रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केला. नाटोमध्ये सहभागी होण्याच्या युक्रेनच्या निर्णयाला विरोध करताना रशियाने साधारण साडेचार वर्षांपूर्वी युक्रेनवर हल्ला केला. तेव्हापासून या दोन राष्ट्रांमध्ये युद्ध सुरू आहे. यामध्ये अमेरिकेकडून युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत आहे. इराणबरोबरच्या युद्धामुळे आता अमेरिकेकडेच शस्त्रास्त्रांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे युक्रेनला होणारा श्सत्रपुरवठा कमी झाला आहे. याचा फायदा घेत रशियाने डाव साधल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content