Homeन्यूज ॲट अ ग्लांसवक्फ कायदा सुधारणा...

वक्फ कायदा सुधारणा विधेयक आजच लोकसभेत!

वक्फ बोर्डाच्या कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करणारे विधेयक आज सकाळी संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज तथा अल्पसंख्याक कामकाज मंत्री किरेन रिजीजू हे विधेयक आज लोकसभेत मांडण्याची शक्यता आहे. वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करण्यास विरोधी पक्षांचा विरोध आहे. हे लक्षात घेता यावेळी प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता आहे.

शेख हसीना सध्यातरी भारतातच

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या काही काळ तरी भारताचा राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी प्रचंड जनक्षोभानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन बांगलादेश सोडले होते त्यानंतर त्यांनी भारतात तात्पुरता आशय घेतला आहे सध्या त्या गाजियाबाद मधल्या हिंडन एअर बेस मध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत राहत आहेत त्या त्यांना अमेरिकेने विजा नाकारला आहे तर इंग्लंडने ही त्यांच्या प्रदेशाला मान्यता दिलेली नाही त्यामुळे ते युनायटेड अरब अमिरात किंवा फिनलँड मध्ये आश्रय घेऊ शकतात अशी शक्यता व्यक्त होत आहे.

विनेश फोगटचा कुस्तीला रामराम 

विनेश फोगटने कुस्तीला रामराम करत कुस्तीतून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. एक्सवर ट्विट करत तिने ही घोषणा केली. आईला उद्देश्यून केलेल्या ट्विटमध्ये तिने कुस्ती जिंकली, मी हरले.. असे म्हटले आहे. दरम्यान, पॅरिस ऑलम्पिकमध्ये कुस्तीच्या आखाड्यात फायनलमध्ये १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यानंतर तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय लवादाकडे अपील करत आपल्याला संयुक्तपणे रौप्यपजक द्यावे, अशी मागणी केली आहे.

भारताच्या पदरी निराशा

दरम्यान, भारताच्या पदरी काल रात्री आणखी दोन ठिकाणी निराशा झाली. वेटलिफ्टर मीराबाई चानू अखेरच्या क्षणी चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. त्यामुळे तिला पदक मिळण्याची शक्यता मावळली. स्टीपलचेसमध्ये पदकाची आशा निर्माण करणारा महाराष्ट्राचा अविनाश साबळे ११व्या स्थानावर आला. त्यामुळे तेथेही क्रीडाप्रेमींची निराशा झाली. आज संध्याकाळी भारताचा पुरूष हॉकी संघ कांस्यपदकाकरीता स्पेनबरोबर लढत देणार आहे. त्याचबरोबर भालाफेकमध्ये सध्या अव्वलस्थानी असलेला नीरज चोप्राकडूनही भारताला पदकाच्या आशा आहेत.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content